पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आलेली रक्कम तो बाजूला ठेवू शकेल आणि संकटाच्या वाईट वर्षी कोणाच्याच-ना सरकारच्या ना विमा कंपनीच्या -तोंडाकडे ना पाहता तो आपला योगक्षेम व्यवस्थित चालवू शकेल. अशा आपापल्या विम्याच्या योजनेसाठी काही यंत्रणा नको, नोकरशाही नको, प्रशासनाचा खर्च नको आणि भ्रष्टाचारालाही वाव नको. शास्त्रीय पद्धतीने पीकविमा योजना चालवायची म्हणजे पीक बुडण्याच्या धोक्याचा खर्च शेतकऱ्याच्या हाती बाजारपेठेतील किमतीच्या रूपाने पडणे आवश्यक आहे. तो नाकारला जात असेल तर कोणतीही पीक विमा योजना सफल होणे अशक्य आहे.

(शेतकरी संघटक, २१ मार्च १९९८)

बळिचे राज्य येणार आहे / १२९