पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेव्हा अर्थकारणाच्या सबबीवर किंवा पर्यावरणाच्या बागुलबुवाने तरी 'सरकारशाही व्यवस्था' काही काळ टिकवावी या बुद्धीने बहुत सारे जुने समाजवादी आज पर्यावरणवादी झाले आहेत.
 दोषास्पदाकडून दोषात्पदाकडे
 प्रत्येक समाजव्यवस्थेच्या स्वत:च्या पर्यावरण समस्या असतात. निसर्गशेतीचा अंमल चालू असताना मलेरिया, कॉलरा, देवी, नारू, खरूज असल्या रोगांनी सर्वदूर थैमान घातले होते. त्याबरोबर दुसऱ्या काही समस्या तयार झाल्या. त्या सोडवण्याच्या प्रयत्नांत मनुष्य गढला आहे. समाज एका दोषास्पद स्थितीतून दुसऱ्या दोषास्पद स्थितीत जातो आणि नवे दोष करता करता आणखीन नवीन समस्या डोक्यावर घेतो. मनुष्याच्या सांत जीवनात 'शांती'ला स्थान नाही. 'अशांती'तून सुटका कदाचित निर्वाणांत किंवा मोक्षांत मिळत असेल; एरवी नाही.
 माणूसही निसर्ग आहे
 निसर्ग हा नेहमीच श्रेष्ठच असतो, कल्याणकारीच असतो असा पर्यावरणवाद्यांचा दुसरा एक दृढ विश्वास आहे. मनुष्यच काय तो दुष्ट आहे आणि तो निसर्गाच्या मंगलकार्यात आड येतो अशी त्याची ठाम कल्पना आहे. सर्वकल्याणकारी निसर्गाने अशी अभद्र मनुष्यजात जन्माला घातलीच का? आणि तिचेच वर्चस्व प्रस्थापित होऊ दिले कसे? असले तार्किक प्रश्न निसर्गवाद्यांच्या भावविश्वात सामावत नाहीत.
 निसर्ग सदाच कल्याणकारी असतोच असे नाही. निसर्ग प्रकृतीने संख्याशास्त्रीय आहे, तटस्था आहे. कधी त्याला वेसणही घालावी लागते. निसर्ग आणि माणसाचे शत्रुत्व नाही. एकाच कुटुंबातील स्त्री-पुरुषांसारखे त्यांचे नाते आहे. नवरा-बायकोत तरी सदसर्वकाळ गोडीगुलाबी आणि चांदणी रात्र असते असे थोडेच आहे!
 अर्थकारण टाळता येत नाही
 निसर्गशेतीच्या पंढरपूरच्या वारीत धर्मवादी, समाजवादी, पर्यावरणवादी हौशा-नवशा-गवश्यांप्रमाणे घुसले आहेत, त्यांच्याविषयी शेतकऱ्यांनी सावध राहणे महत्त्वाचे आहे.
 घाट्यातील शेती

 रासायनिक शेतीच्या अनुभवाने शेतकरी पोळला आहे, भांबावला आहे. त्याला आपल्या नादी लावण्याच्या प्रयत्न करणारे अनेक आहेत, त्यांच्यापासून

बळिचे राज्य येणार आहे / १०९