पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होणाऱ्या वस्तूंचा, निविष्ठांचा वापर कमी. निसर्गशेतीत काही प्रखर निष्ठावान आहेत. एखाद्या सोवळ्या ब्राह्मणाप्रमाणे रसायनाच्या सावलीचाही विटाळ त्यांना खपत नाही. एक कण जरी रसायन आले तरी त्यामुळे सगळे नैसर्गिक चक्र बिघडून जाण्याची धास्ती त्यांना वाटते. बाकीच्यांची, आवश्यकता पडल्यास थोडीफार तडजोड करण्याची तयारी असते. या नव्या चळवळीत निसर्गवादी आहेत, तत्त्वज्ञानी आहेत, धर्मवादी आहेत पर्यावरणवादी आहेत, काही काही तर शेतकरीसुद्धा आहेत.
 दुसरा एक प्रवाह
 निसर्गशेतीच्या प्रवाहाबरोबर दुसरीही एक जबरदस्त विचारधारा आहे. नुकतेच महाराष्ट्रातील चार-पाचशे शेतकरी इस्रायलला जाऊन आले. शिवाय अर्थव्यवस्थेच्या खुलीकरणामुळे, निर्यातीसाठी, बी-बियाणे इत्यादींच्या आयातीसाठी अनेक तरुण शेतकऱ्यांचा परदेशी शेतकी तंत्रज्ञानाशी संबंध आलेला आहे. या मंडळींच्या तोंडची भाषा निसर्गशेतीवाल्यांपेक्षा अगदीच वेगळी आहे. आधुनिक व्यापारी शेतीकरीता शेतीमालाचे हुकमी उत्पदन घेतले पाहिजे, निर्यातीचे करारमदार झाले आणि उत्पादनच झाले नाही तर जागतिक बाजारपेठेत आपल्याला स्थान राहणार नाही हे त्यांना चांगले समजते आहे. हुकमी उत्पादन झाले पाहिजे एवढेच नव्हे तर ते उत्पादन ठराविक गुणवत्तेचे झाले पाहिजे; रंग, रूप, आकार, गंध, स्वाद, स्पर्श, चव, शुद्धता अशा सगळ्या कसोट्यांना माल उतरला पाहिजे. त्यांकरिता प्रचंड आच्छादित घरे बांधून उष्णतामान, पाणी, खते, औषधे यांचा ठराविक आणि नियमित पुरवठा करणाऱ्या जवळपास कारखानदारी तंत्रज्ञानाकडे ते वळत आहेत. माल तयार झाल्यानंतरही त्याची तोडणी, शीतकरण, आवेष्टन, साठवणूक, विक्री, प्रक्रिया, निर्यात याकरिता अधिकाधिक कारखानदारी साधने उपयोगात आणण्याची आवश्यकता ते हिरीरीने मांडतात.
 एकट्या महाराष्ट्र राज्यातच शेतकऱ्यांमध्ये आणि शेतीसंबंधी दोन विचारप्रवाह सारख्याच हिरीरीने मांडले जात आहेत. एक 'निसर्गशेतीचा' आणि दुसरा 'उद्योजक शेतीचा'.

 उद्योजक शेतकरी निसर्गशेतीच्या तसे विरोधी नाहीत, द्राक्षे, फुले, स्ट्रॉबेरी यांची निर्यात करणारी अनेक शेतकरी मंडळी आग्रहाने वरखतांचा वापर टाळतात किंवा मर्यादित ठेवतात. औषधांच्या उपाययोजनांत मात्र काही किरकोळ अपवाद सोडल्यास रासायनिक औषधांचा वापर हे उद्योजक शेतकरी

बळिचे राज्य येणार आहे / १०२