पान:बलसागर (Balsagar).pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 

 स्वतत्त्व आणि सुतत्व

 

 महाराष्ट्र साहित्य-पत्रिकेच्या चालू एप्रिल-मे-जून अंकात 'विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि महात्मा जोतिबा फुले' यांच्या कार्यासंबंधी श्री. द. न. गोखले याचा एक अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झाला आहे. अभ्यासाबरोबरच लेखकाचा समन्वयवादी व तौलनिक दृष्टिकोनही लेखात जागोजाग प्रगट झाला आहे व समारोपात तर लेखकाने स्वच्छच लिहिले आहे की, 'वर्तमान काळाची नि येत्या शतकाची अशी मागणी आहे की, आम्हाला विष्णुशास्त्री चिपळूणकर हवे आहेत आणि महात्मा ज्योतिबा फुलेही हवे आहेत. आम्हाला सामाजिक समता मागणारे चिपळूणकरही पाहिजे आहेत आणि ज्वलंत राष्ट्रवाद पुकारणारे फुलेही पाहिजे आहेत. छे! छे ! प्राप्त काळ वाट बघत आहे विष्णुशास्त्री फुल्यांची !! जोतिबा चिपळूणकरांची !!'

 ही समन्वयी भूमिका स्वागतार्हच आहे; पण फुले सांप्रदायिकांकडून प्रतिसाद कितपत मिळेल हे सांगवत नाही. जनता राजवटीत जयप्रकाशांच्या मध्यस्थीमुळे राष्ट्रवादी आणि समतावादी प्रवाह काही काळ एकत्र आले होते. दुहेरी दास्यत्वासारख्या एका फालतू प्रश्नावर शाब्दिक रणे माजवली गेली आणि हे प्रवाह अलग झाले. हा अलगपणा सध्या इतका टोकाला गेलेला आहे की, पुण्यात निघालेली विश्व हिंदू परिषदेची प्रचंड मिरवणूकही समतावाद्यांना पाहवली नाही पण त्यांनी या मिरवणुकीचा जनमानसावरील प्रभाव पुसून टाकण्यासाठी, डावास प्रतिडाव म्हणून, राष्ट्रीय एकात्मता परिषदांचा धडाका उडवून दिला. वास्तविक अस्पृश्यतेची मृत्यूघंटा वाजवीत निघालेली हिंदू धर्मानुयायांची मिरवणूक पाहून

।। बलसागर ॥ ९७