पान:बलसागर (Balsagar).pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांनी केलेल्या समाज सुधारणेच्या कार्याचा आढावा घेताना ते म्हणाले, ' अस्पृश्यता निवारणाचे फार मोठे कार्य सावरकरांनी पतितपावन मंदिराची स्थापना करून केले. दलित व हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळावा, समाजात सन्मानाचे स्थान प्राप्त व्हावे, म्हणून त्यांनी हिरीरीने प्रयत्न केले. जे ते बोलत, ते ते आचरणात आणीत. सावरकर हिंदुत्वनिष्ठ होते; पण त्यांचा कर्मकांडावर विश्वास नव्हता. धर्मांतराला ते विरोध करीत. धर्मातरित बंधुंना परत आपल्यात आणण्यावर त्यांचा कटाक्ष असे. कारण सावरकरांचे स्पष्ट मत होते की, भारतात धर्मातराचा अर्थ राष्ट्रांतर आहे.'
 लाईट ऑफ अंदमानचे संपादक परशुराम आपल्या भाषणात म्हणाले की, सावरकरांच्या प्रयत्नामुळे आज अंदमान-निकोबार भारताचा भूभाग आहे. अंदमानमध्ये आर्यसमाजाच्या कार्याचा पाया अप्रत्यक्षपणे सावरकरांनी घातला. सेल्युलर जेल मधील वास्तव्यात कैद्यांना हिंदी त्यांनी शिकविले व जेलमध्ये त्या काळी असणा-या कैद्यांना धर्मातरित होण्यापासून वाचविले. त्यांचे ऋण आम्ही कसे विसरणार ? सावरकरांचे विचार स्थानीय लोकांपर्यंत पोहचवून त्यांचा या समितीच्या कामात सहयोग असावा अशी त्यांनी विनंती केली.
 अध्यक्ष श्री. लक्ष्मणसिंह यांनी समितीतर्फे लवकरच एक पोहण्याची शर्यत आयोजित केली जाईल व विजेत्याला फिरती ढाल देण्यात येईल अशी घोषणा करून उपस्थितांना, वक्त्यांना व शासनाच्या सहयोगाबद्दल शासनाला धन्यवाद दिले.
 कार्यक्रमाचे संचालन श्री. सेवाराम सेतिया, प्राध्यापक, गव्हर्नमेंट कॉलेज; पोर्टब्लेअर, यांनी केले.

 असे हे सत्य हळूहळू मान्यता पावत आहे. आजवर दडपला गेलेला सशस्त्र कतिप्रयत्नांचा इतिहास हळहळ प्रकाशात येत आहे. या ज्वलंत इतिहासापासून १ता घ्यावी असे भारतीय जनतेला वाटू लागलेले आहे.

 अदमानला स्थापन झालेल्या सावरकर जन्मशताब्दी समारोह समितीच्या "हल्या बैठकीला पुण्याच्या 'एकता' मासिकाचे संपादक श्री. रामदास कळस" हे उपस्थित होते. पूर्वी ते संघाचे प्रचारक होते व सध्याही मासिकाच्या "दनाबरोबरच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांचे संघकार्यही चालू आहे आणि एका 3 रागाशी सामनाही ! या सामन्याची वाच्यता नाही. जाहिरातबाजी नाही. यकती माणसे जर अंदमानातील सावरकर जन्मशताब्दी समारोह समिताउभा असतील तर शासनाचे पाठबळ लाभो न लाभो, सावरकरांचे, भारतीय

।। बलसागर ।। ९५