पान:बलसागर (Balsagar).pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गेल्यावरसुद्धा, समतेचे नंदनवन अगदी वाट पहात आहे, असे समजण्याचे कारण नाही. मुस्लिमधर्मातही अनेक सुज्ञ व्यक्ती अशा असतील की, ज्यांना अशा त-हेने होणारे धर्मातर पसंत नसेल . अशांची मदत घेऊन ही मीनाक्षीपुरम्ची लाट थोपवता आली तर नेहमीचा हिंदू-मुस्लिम कटतेचा प्रश्नही उद्भवणार नाही. हिंदू, मुस्लिम व ख्रिस्ती या सर्व धर्मातील सूज्ञ व विवेकी मंडळींनी, राष्ट्रवादी दृष्टिकोनातून संयुक्तपणे असा प्रयत्न करणे केव्हाही श्रेयस्करच ठरणार आहे !

 हिंदुधर्म हा विश्वधर्म आहे असे हिंदुधर्माचे थोर प्रवक्ते नेहमी सांगत असतात आणि ते बरोवरही आहे. हिंदुधर्म हा समुद्रासारखा आहे व इतर धर्म हे नद्यांसारखे आहेत असे विनोबांनी म्हटले आहे. हिंदुत्वातला हा वैश्विक गाभा विचारातून, आचारातून प्रकट होत राहील हे पाहण्याची जबाबदारीही ओघाने हिंदुत्वाभिमान्यांकडे येते. तात्कालिक आक्रमणे परतवून लावत असताना या मूळ गाभ्याला धक्का लाग देता उपयोगी नाही. मुस्लिम मनोवृत्तीचे हिंदू तयार होणे हा काही हिंदुत्ववादाचा अंतिम विजय नव्हे. सगळ्या पंथोपपंथांना सामावून घेण्याइतका हा हिंदुत्वाचा समुद्र विशाल व व्यापक असायला हवा. एका उदार जीवनदृष्टीचा परिपोष या धर्मामुळे होत रहावा. केवळ सहिष्णुता, केवळ सर्वधर्मसमभाव, एवढेच पुरेसे नाही. सर्वधर्मसत्यभाव हे हिंदुधर्माचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. ईश्वरप्राप्तीचे अनेक मार्ग असू शकतात. प्रत्येक मार्गात सत्याचा थोडा-अधिक अंश असू शकतो. अंतिम सत्य एकच असले तरी त्याचा साक्षात्कार विविध पद्धतीने होऊ शकतो, हे ज्ञानाचे उच्च शिखर आजवर फक्त हिंदुधर्म - तत्वज्ञानांनीच गाठले आहे. एक पुस्तक - एक प्रेषित - एक मार्ग याचा अट्टाहास हिंदुधर्माला मंजूरच नाही. ही वैश्विक व सर्मसमावेशक दष्टी तात्कालिक चळवळींच्या गदारोळात लुप्त झाली तर जतन करण्यासारखे हिंदुधर्मात काही उरणार नाही. हिंदू शरीरे फक्त विस्तारून काय उपयोग ! शरीरे हवीत ती आत्मा प्रकट व्हावा म्हणून. धर्मातराच्या प्रश्नाकडेही तात्त्विकदृष्ट्या हिंदू माणूस कसा पाहात असतो ? श्री. गोळवलकरगुरुजींनी आपल्या विचारधन' पुस्तकात शंकराचार्याचेच उदाहरण आदर्श म्हणून दिले आहे. गोळवलकरगुरुजी म्हणतात : “ आमच्या धर्माच्या आणि तत्त्वज्ञानाच्या शिकवणुकीनुसार हिंदू व मुसलमान दोघे सारखेच आहेत. अतिम ईश्वरी सत्याचा साक्षात्कार हिंदूलाच होऊ शकतो असे नाही. आपापल्या मतानुसार परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग अनुसरण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मी शृंगेरी मठाचे माजी शंकराचार्य श्रीमद् चंद्रशेखर भारतीस्वामी यांचे एक उदाहरण सांगतो. एकदा एक अमेरिकन मनुष्य त्यांच्याकडे आला व ' मला हिंदू करून घ्या ! ' अशी त्याने विनंती केली. शंकराचार्यांनी

।। बलसागर ।। ८५