सत्तास्थानावरून तथाकथित उच्चवर्णीय हिंदू पार हुसकले-हाकलले गेलेले आहेत. याच तामीळनाडूत- एका हिंदू निर्मूलक द्रविड राज्यात हरिजनांचे हाल चालु राहावेत, त्यांना इस्लामधर्म स्वीकारावासा वाटावा, हा केवळ हिंदूविरोधी चळवळीचा वास्तविक केवढा पराभव आहे ! तेव्हा हिंदुत्वाला झोडपून प्रश्न सुटणार नाही. सगळ्यांनीच विषमतेचे आविष्कार पुसून टाकण्यासाठी प्रामाणिक धडपड केली पाहिजे. या धडपडीवर समजा हरिजनांचा, दलितांचा विश्वासच बसत नसेल तर बळजबरीने, आर्थिक लालूच दाखवून वगैरे त्यांना हिंदुधर्मात ठेवण्याचा अत्याग्रह मात्र अजिबात दाखवू नये. दलितांनी इस्लामधर्म स्वीकारल्यावर ते अधिक आक्रमक होतील याचीही भीती बाळगण्याचे काही कारण नाही. एक काळ असा होता की, निम्मा-पाऊण हिंदुस्थान मुसलमानांच्या ताब्यात होता. तोही हिंदूंनी मुक्त केलाच. मुस्लिम प्रश्नावर शिवाजी हाच तोडगा आहे. गांधीजी नव्हेत. शिवाय आता तर परधर्मात गेलेल्या अनेकांना हिंदुधर्मात परत घेणारी शुद्धी चळवळही अस्तित्वात आहे. पन्नास वर्षांपूर्वी लाखोंनी हरिजन इस्लाम धर्मात गेले. या सगळ्यांना परत हिंदुधर्मात आणणारा श्रद्धानंद उद्या पुन्हा निर्माण होणार नाही कशावरून? म्हणून कायद्याने धर्मांतराला बंदी घालण्याची सध्यातरी आवश्यकता नाही. प्रचलित कायद्यांची अंमलबजावणी नीट झाली तरी सक्तीने, धाकधपटशाने होणारे धर्मांतर थांबवता येईल. पैशाच्या लोभाने किंवा इतर काही फायदे मिळतात म्हणून जे मुस्लिम धर्मात जाऊ इच्छितात त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही एकदा मान्य केल्यावर कोण कसे अडवू शकणार ? पैशाच्या, जहागिरीच्या लोभाने राज्येही आपण पूर्वी घालवली आहेत. मोंगल सम्राटांना आपल्या मुली देणारे दलित थोडेच होते ? तेव्हा कायद्याने धर्मांतर थांबविणे शक्य व योग्यही ठरणार नाही. शुद्धीकरणाची चळवळ चालू राहिली तर मुसलमानातील निदान जाणकारांना तरी हा सगळाच खटाटोप निरर्थक वाटू लागण्याचीही शक्यता आहे. सध्याच, औरंगाबादेतील काही सूज्ञ मुस्लिम व्यक्तींनी, आर्थिक-राजकीय लाभांसाठी मुस्लिम धर्मात येणारे, उद्या अधिक लाभ मिळाले तर परत हिंदू किंवा इतर धर्मात कशावरून जाणार नाहीत, अशी रास्त शंका उपस्थित करून, या पद्धतीच्या धर्मांतराविषयी प्रतिकूल मत नोंदवले आहे. नव्याने जे हरिजन–दलित मुस्लिम होत आहेत, त्यांच्यापैकी बरेचजण सुंता करून घ्यायला तयार नसतात. अशा सुंता न करता आलेल्यांना, कर्मठ, जुने मुसलमान बरोबरीच्या नात्याने कसे वागवतील? मदुराईजवळच्या मेलाकोट्टाई येथे जुन्यांना, नव्या धर्मांतरितांनी आपल्याबरोबर मशिदीमध्ये नमाज पढणेही पसंत नव्हते. चक्क बाचाबाची झाली व जुन्यांना व नव्यांना नमाजाच्या वेगवेगळ्या वेळा ठरवून द्याव्या लागल्या. तेव्हा इस्लामची दारेही हरिजन - दलितांसाठी सताड उघडी आहेत व आत
पान:बलसागर (Balsagar).pdf/85
Appearance