पान:बलसागर (Balsagar).pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लोकसंख्या वाढविली असे या प्राध्यापक महाशयांना सांगायचे होते.)' दहापैकी नऊ मुसलमानांच्या मनात अशा प्रकारची आणखी पाकिस्ताने निर्माण करण्याची भावना असते, असेही या लेखात हमीद दलवाईंनी म्हटलेले आहे. ही वस्तुस्थिती असल्याने मीनाक्षीपुरम्चे धर्मातर हे राष्ट्रांतर ठरते व पुण्यात, स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास लाजणान्या समाजवाद्यांनाही, या घटनेवर चर्चा घडवण्यासाठी, एखादा परिसंवाद आयोजित करावासा वाटतो. हे जर पन्नास वर्षांपूर्वी,समाजवादी-काँग्रेसवादी जनांना जाणवले असते तर पाकिस्तान झालेच नसते; पाकिस्तान होऊनही मुस्लिमांच्या राष्ट्रीयत्वाचा प्रश्न सुटलेला नाहीच. तो होता तिथेच आहे. फक्त हिंदू समाजात अधिक जागृती झालेली आहे व सावरकर- गोळवलकर पूर्वीइतके आज अस्पृश्य राहिलेले नाहीत. शब्द हिंदू' ठेवा किंवा 'भारतीय' असू द्या. उद्या भारतीयत्वाची व्याख्या करण्याचा प्रयत्न झाल्यास ‘समान भारतीय परंपरेचा वारसदार तो भारतीय' असेच ठरवावे लागेल. शेवटी राष्ट्रीयत्व म्हणजे तरी काय ? एकत्वाची अखंड जाणीव. अशी जाणीव समान परंपरेच्या मान्यतेवाचून सहसा निर्माण होत नाही. ज्यावेळी व्यास -वाल्मिकी, रामकृष्ण-शिवाजी यांना येथील मुसलमान आपलेसे मानतील, हा ऐतिहासिक वारसा स्वीकारायला तयार होतील, जीनांपेक्षा नेहरू त्यांना जवळचे वाटतील, तेव्हा मीनाक्षीपुरमूसारखी एखादी घटना इतकी खळबळ माजवू शकणार नाही. तेही एक पथांतर ठरेल, जसे आंबेडकरांचे बाद्ध होणे ठरले, ठरत आहे तसे. फक्त तो दिवस अद्याप खूप लांब आहे हेही विसरून चालणार नाही.

 इस्लामधर्मातही भरपूर विषमता आहे. समतेच्या अपेक्षेने जे हरिजनदलित या धर्मात जातील त्यांचा भ्रमनिरासच होण्याची शक्यता अधिक आहे. मीनाक्षीपुरमला धर्मातरित झालेल्या स्त्रियांना लगेच बुरखे पुरविण्यात झाले. नमाज पढण्याच्या वेळी सगळे समान असतील, पण व्यवहारात उच्चनीचभाव, विषमता इस्लाम धर्मातही यथेच्छ पाळली जाते. आर्थिक व सामान जक समता हे नवेच मूल्य आहे व समाजवादी तत्वज्ञानामुळे ते विसाव्या शतकात मान्यता पावत आहे. सगळ्याच जुन्या धर्मात कमीजास्त प्रमाणात, निरनिराळ्या स्वरूपात विषमता असणार हे गृहीत धरायला हवे. केवळ हिंदूधर्माला वेगळे काढून झोडपण्याचे आपल्याकडच्या डाव्यांचे प्रयत्न अज्ञानमूलक आहेत.तामीळनाडूत गेली पन्नास-पाऊणशे वर्षे रामस्वामी नायकर व त्यांची द्रविड मुनेत्र चळवळ हिंदू धर्मावरच फक्त आघात करीत राहिली. मुसलमान ख्रिश्चनांनी केली नसेल एवढी हिंदूधर्मीय देवदेवतांची विटंबना या नायकर चळवळीने खुद्द मद्रास शहरात केली. डी. एम्. के. उदयानंतर तर सर्व

।। बलसागर ।। ८३