वगैरे जरी आपण बोलत किंवा मानत असलो तरी बौद्ध व इस्लाम या दोन धर्मात आपल्यापैकी बहुतेकजण मनोमन फरक करतात. तीन लाख हरिजन एकाच दिवशी, आपल्या नेत्यासह, बौद्धधर्मात गेले म्हणून आपण फारसे अस्वस्थ झालो नाही; पण हजार-दोन हजार हरिजन इस्लाममध्ये गेल्यावर मात्र सगळयांचे डोळे खाडकन उघडतात - ही तफावत, ही विसंगती कुठल्याही सर्व धर्मसमभावात न बसणारी आहे. जरी प्रमुख नेते आणि विचारवंत यांनी आंबेडकरांच्या बौद्धधर्म स्वीकाराकडे त्यावेळी दुर्लक्ष केले तरी सावरकर हे एक सन्माननीय अपवाद होते. सावरकरांनी आंबेडकरांच्या धर्मातराला ‘पथांतर' म्हटले व ‘बौद्ध आंबेडकर हे हिंदू आंबेडकरच आहेत,' असे निश्चयात्मक मत त्याच वेळी लेखाद्वारे व्यक्त केले. बौद्धधर्म हा व्यापक हिंदुत्वाच्या, हिंदू धर्माच्या व्याख्येत बसणारा एक पंथ आहे अशीच आपली सर्वसाधारण समजूत आहे. लोकमान्य टिळक, राधाकृष्णन इत्यादी अनेक हिंदू पंडितांची मते तर सोडाच; खुद्द डॉ. आंबेडकरांच्या धर्मातर प्रसंगी नागपूरला उपस्थित असणा-या बौद्धपंडितांनीही अशाच अर्थाचे मतप्रकटन केले आहे. * महास्थविर चंद्रमणी आणि इतर भिक्ष यांनी (आंबेडकरांच्या) धर्मांतराच्या दीक्षासमारंभाच्या वेळी जे पत्रक प्रसिद्ध केले होते, त्यात हिंदूधर्म आणि बौद्धधर्म ह्या एकाच वृक्षाच्या फांद्या आहेत असे म्हटले होते,' ही धनंजय कीरांनी आपल्या आंबेडकर चरित्रात केलेली नोंद (पृ. ५२३) काय सुचविते ? आंबेडकर व त्यांचे अनुयायी थोडे दूर गेले तरी आपल्याला कायमचे पारखे-परकीय झाले नाहीत, असेच त्यावेळी सर्वसाधारण हिंदू मत होते व पंडितांचा निर्वाळाही यापेक्षा वेगळा नव्हता.
धर्म जर खरोखर बदलला असता तर हरिजनांना मिळणाच्या सवलती ताकिकदृष्ट्या रद्द व्हायला हव्या होत्या. कारण या सवलती हिंदुधर्मीय पूर्वास्पृश्यांसाठी होत्या; पण तसे घडले नाही. काँग्रेस व जनता सरकारनेही या सवलती वेळोवेळी मुदत वाढवून चालूच ठेवल्या व हे योग्यच झाले. सामाजिक विषमता हे सर्व हिंदूधर्मीयांचे सामुदायिक पाप आहे व त्यांनीच ते फेडले पाहिजे, अशी यामागील सर्वसाधारण भावना होती व अजूनही काही काळ अशा सवलती चालू राहिल्या तर हिंदुधर्मीयांनी कसलीही खळखळ करणे बरोबर नाही, सवलतीतले गैरप्रकार मात्र कमी व्हायला पाहिजेत, यापेक्षा अधिक चांगल्या मार्गाचा शोधही चालू राहायला हवा. मुद्दा हा की, हरिजनांचे बौद्ध होणे आपण धर्मातर मानले नाही, पथांतर मानले. पक्ष कोणताही असो.
पं. नेहरूंचा दृष्टिकोन काय होता ? धनंजय कीरांनी आपल्या आंबेडकर आहे. हे अवतरण नॉर्मन चरित्रात नेहरूंचे एक अवतरणच दिले