Jump to content

पान:बलसागर (Balsagar).pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फोटो लावून ‘परं वैभवं नेतुमेतत्स्वराष्ट्र' म्हणणा-यांनी सेवेला पराक्रमाची पुरुषार्थाची जोड द्यायला हवी. शिवाजी तिकडे व्हिएटनामच्या जंगलात हरवला आहे, त्याला यासाठी हुडकून इकडे आणावे लागेल. रायगडाला प्रदक्षिणा कसल्या घालता आहात ? गडागडांवरचे पाणी बाटल्यांतून भरून आणून या ३०० व्या शिवाजी पुण्यतिथीनिमित्त शिवसमाधीवर अभिषेक काय चालवले आहेत ? साम्राज्यवाद्यांविरुद्ध लढून हो चि मिन्हने व्हिएतनाम अखंड केला. आणि आपल्याला आसामचा प्रश्न हीसुद्धा एक डोकेदुखी ठरावी ! धन्य आहे आपल्या शिवप्रेमाची !

मार्च १९८०

।। बलसागर ।। ६९