अशी उपाययोजना वेळीच सुचविणाऱ्या एखाद्या सावरकरालाच आपण वाळीत ढकलून मोकळे होतो. आपण आपापसात दंगली काही कमी करीत नाही. आपण फार मोठे उदारमनस्क, शांतताप्रेमी किंवा अहिंसेचे पालन के रणारे आहोत, हेही खरे नाही. बरेचदा आपल्या मारखाऊ आणि पराभूत वृत्तीवर आपण ही नैतिकतेची झूल उगाचच चढवत असतो. ही झूल थोडीफार ओढून काढणारा सावरकरसुद्धा आपल्याला जिथे पचला नाही तेथे शिवाजीचे नावसुद्धा आपण का घ्यावे ? शिवाजीला आपण एक तर कुंपणावर तरी बसवून ठेवले आहे किंवा फोटोतून, पुतळ्यातून तो बाहेर पडणार नाही अशी दक्ष सावधानता बाळगली आहे. रायगडाला आपण जाग आणली. पण शिवाजीला झोपवले आहे. अलिकडच्या काळात आपले वेद जर्मनांनी नेले. त्यावर संशोधन वगैरे करून चांगल्या स्वरूपात ते आपल्याला व जगाला पुन्हा उपलब्ध करून दिले. आपली योगविद्या रशियात, अमेरिकेत व इतर विज्ञानात पुढे असणा-या देशात सध्या उचलली जात आहे व लवकरच ती Import ही होऊ लागेल. तसाच आपला शिवाजी देखील माओने, हो चि मिन्हने पळवला होता. तो अद्याप गायबच आहे. आपण फक्त त्याच्या पुण्यतिथ्या साजच्या करीत आहोत. वंगला देशातून निर्वासित येताहेत ? ठीक आहे. मी बंगला देशच भारताला जोडून घेतो, असे खरा शिवाजी म्हणाला असता. त्याने सुरतेची लूट का केली ? पैसा नव्हता हे एक कारण खरेच. पण औरंगजेबाच्या मामाने, शाहिस्तेखानाने पुण्यास तळ देऊन स्वराज्याची फार नुकसानी केली होती. ही नुकसानी वसूल करावी म्हणन, त्यावेळी औरंगजेबाच्या ताब्यात असलेल्या सुरतेवर शिवाजी चालून गेला. शत्रूच्या प्रदेशात घुसत नाही तो शिवाजी कसला ? इराणमध्ये अमेरिका घुसते आहे म्हणून अफगाणिस्तान आम्ही ताब्यात ठेवणार असे म्हणणा-या रशियाची आम्ही बाजू घेणार, त्याचे समर्थनही करणार आणि इकडे बंगलादेशीय म्हणजेच पूर्व पाकिस्तानी, आपल्या प्रत्यक्ष घरातच वर्षानुवर्षे घुसखोरी करीत आहेत तरी, त्यांना नुसते परत जायला सांगण्यातही खळखळ करणार, आपापसातच यासाठी कालमर्यादेवर भांडाभांड करणार ! विसंगतीचा, अभिजात घोळघाल वृत्तीचा हा कहर झाला. तुलनेने लहान असलेल्या बंगलादेशच्या बाबतीत आपला असा घोळ आणि पडखाऊपणा दिसतो आहे, तर जेथे चीन-अमेरिका या महासत्तांनो शिरकाव केलेला आहे त्या पूर्वाचलाच्या समस्येला आपण कसे व केव्हा भिडणार आहोत ? शिवाजीचे नाव घेणा-यांनी तरी या पडखाऊ वृत्तीवर प्रहार करायला हवेत. मतांवर, निवडणुकीतील यशावर डोळा ठेवून, गोडगोड आणि गुळगुळीत बोलण्याच्या वक्तृत्वस्पर्धेत त्यांनीही भाग घेण्याची काही आवश्यकता नाही. ज्यांचे सत्ता हेच सर्वस्व आहे त्यांना गोड बोलणे नि नुसते हसणे याशिवाय पर्यायच नसतो. पण शिवाजीचे
पान:बलसागर (Balsagar).pdf/69
Appearance