पान:बलसागर (Balsagar).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कायमची तोडण्याचा निश्चयच या देशाने केला पाहिजे. निदान या युद्धात पूर्व बंगालप्रमाणे काश्मिरचा प्रश्न तरी निकालात निघावा. पुढचे आणखी पुढे पाहता येईल. मात्र यासाठी गरिबी हटाव आणि पाकिस्तान हटाव या दोन्ही आघाड्यांवर आपल्याला झुंझावे लागणार आहे. हे जोडकाम करण्याचे आपण नाकारू तर विजय अर्धवट राहणार आहे. चीन अमेरिका यांच्या संयुक्त शक्तीला तोड देणे आपल्याला कठीण जाणार आहे. हे जोडकाम जो नेता, जो पक्ष साधेल तो हिंदुस्थानचा भाग्यविधाता ठरणार आहे. एकविसाव्या शतकाचे महाद्वार, हिंदुस्थानसाठी या जोडकामामुळेच उघडले जाणार आहे. चालू युद्ध हे फक्त या महाद्वाराच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. आणखी पुढे जायला हवे. जायला हवे. जायला हवे.

डिसेंबर १९७१

।। बलसागर ।। ५९