संबंधांवर निखारा ठेवायला लावणारे असते म्हणून जर पुढे ढकलाल तर आत्ताच सांगून टाकलेले बरे की, हे युद्ध अखेरच्या विजयक्षणापर्यंत, महाशय, तुम्ही खेळूच शकणार नाही. तडजोडी अपरिहार्य ठरतील आणि आजचे संकट फारतर उद्यावर ढकलण्यात आपण यशस्वी ठरू. हे घडायला नको असेल तर आपण सर्वंकष पूनमांडणीचा आग्रह सुरुवातीपासूनच धरला पाहिजे, तशी खंबीर पावले त्वरेने उचलली पाहिजेत.
कसे घडते पाहा. वास्तविक पुणे हे आता काही केवळ एक शैक्षणिक केन्द्र उरलेले नाही. उद्योगधंद्यांचा पसारा येथे आता खूप वाढलेला आहे. तरीपण युद्धप्रयत्नात सहभागी होण्याची पुण्याच्या प्रतिष्ठित नेते मंडळींची पहिली उडी जवानांसाठी केवळ पाच लाख रुपयांचा एक रणगाडा घेऊन देण्यापलीकडे जाऊ शकला नाही. वास्तविक पाच लाखांची रक्कम तर लक्ष्मी रोडवरच्या एका बाजूकडून जमा व्हायला हवी. जाहिरातबाजी आणि रोषणाईला आळा बसवला तरा है जमणे कठीण नाही. ही रक्कमही पुन्हा बचतीत फक्त गुंतवायची आहे. दहा-पाच वर्षांनी ती ज्याची त्याला परतच मिळायची आहे. तरीही उद्दिष्टांचा जाकडा ठरविताना पुण्यातील प्रतिष्ठित नेते मंडळींनी प्रारंभीच एवढा हात खून ठेवला आहे. हा हातराखूपणा कशाचे लक्षण आहे ? मूळ चौकटीत बदल करता वरचेवर काही हलवाहलवी करून प्रश्न सोडविण्याच्या संकुचित दृष्टीचे ९ लक्षण आहे. यामुळे डोक्यावरचे ओझे फार तर खांद्यावर घेतले जाईल. ते जगावरून फेकून देण्याचे सामर्थ्य प्राप्त होणार नाही. सुरुवातच करायची तर 3"यातील प्राप्तीकर कार्यालयातून प्राप्तीकर चुकविणा-यांची यादी घेऊन, या करचुकव्यांना आठवडा-पंधरवड्याच्या आत चुकवलेले कर भरण्यास भाग पाडले पाहिजे. सरकारच्या हाती यासाठी भरपूर अधिकार यापूर्वीच दिले गेलेले अहित. ते सर्व वापरून हे काम पुरे केले पाहिजे. मग मोर्चा वळवला पाहिजे 3प्यातल्या बड्या उद्योगपतींकडे-कारखानदारांकडे. एकटा किर्लोस्कर समूह जवानासाठी नॅट विमान देऊ शकतो. येत्या दोन-चार वर्षांची किर्लोस्कर परिवीराची डिव्हिडंट्स वगैरे यासाठी राष्ट्रीय बचतीकडे गुंतवली गेली तरी हे काम " हाण्यासारखे आहे. पण असे काही घडणार नाही. किर्लोस्कर पाच-पंचवीस ९जार रुपये इकडे तिकडे नाचवतील. वर्तमानपत्रात याचाच अधिक गवगवा होईल आणि सामान्य माणसाला मात्र रॉकेलसाठी, पोस्टाच्या तिकिटापाकिटाTO, प्रवासासाठी, यद्धखर्च म्हणन जादा पैसे दर पावलागणिक मोजत बसावे तिलि. लक्षभोजनप्रिय मंडळींना तर आता केवढी तरी संधी आहे! लक्ष पलटणीसाठी लागणारा अन्नपुरवठा करण्याचे ते ठरवू शकतात. यासाठी