पान:बलसागर (Balsagar).pdf/57

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रीस संपूर्ण पाकिस्तानच मोडून काढण्याची दीर्घदृष्टी व संघर्षाची ईर्षा आपण बाळगली पाहिजे व त्याप्रमाणे आपल्या सर्व सामाजिक-आर्थिक जीवनाची मजबूत पायावर पुनर्माडणी केली पाहिजे. युद्ध आज, पुनर्माडणी उद्या ही प्रवृत्ती घातक आहे. तिला वेळीच पायबंद घातला पाहिजे. अर्थव्यवस्था दुबळी ठेवून युद्ध आपल्याला कसे खेळता येणार आहे ? सामाजिक विषमतेने पोखरलेले राष्ट्र उद्या पाकिस्तानच्या बाजूने चीन युद्धात उतरले तर कसे टिकाव धरू शकणार आहे ? बेकारांचे तांडे आहेत तसे भरकटत ठेवले, लक्षावधी एकर जमीन पडीक ठेवली तर युद्धाच्या वल्गना कितीही केल्या तरी विजय दूरच राहील. मोठमोठ्या जमीनदाच्या या युद्धकाळातच ताबडतोब निकालात काढल्या गेल्या पाहिजेत. दडलेली काळी संपत्ती खेचून बाहेर काढली पाहिजे. मक्तेदारांना वठणीवर आणले पाहिजे. चोरटया व्यापा-यांना व त्यांना आश्रय देणा-या मंडळींना चौकात फटकारले पाहिजे. हे सर्व आमूलाग्र परिवर्तन आपण नाकारू व अशा आमूलाग्र परिवर्तनाचा आग्रह धरणा-यांना, युद्ध प्रयत्नात अडथळा आणणारे म्हणून खड्यासारखे वाजूस सारू, तर आपले अखेरचे उद्दिष्ट आणखीनच लांबणीवर पडेल. बांगला देशप्रमाणे सिंध, बलुचिस्तान या भागातही विघटनकारी शक्ती जोर धरीत आहेत. या शक्तींना प्रोत्साहन देऊन पाकिस्तान अखेरीस नष्ट करणे, आशियातील एका धर्माध व प्रतिगामी सत्तेचा बिमोड करणे व लोकशाही व समाजवाद मानणा-या आशियाई शक्तींचे नेतृत्व करणे हे आपले अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे. यासाठी गरिबी हटाव व पाकिस्तान हटाव या दोन्ही आघाड्यांवर आपल्याला सतत झुंजावे लागणार आहे. आपल्याकडील हितसंबंधी गट एका वेळी एकाच आघाडीचा युक्तिवाद पुढे मांडत राहतील, हीही शक्यता आहे. अशावेळी या हितसंबंधी गटांना जनतेने निग्रहपूर्वक सांगितले पाहिजे की, महाशय, देशभक्तीचा मक्ता आपल्याला एकटयालाच काही बहाल केलेला नाही. प्रत्येक भारतवासीयाला आपली देशभक्तीची पवित्र भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली पाहिजे. आपण ही संधी मिळू देणार आहात की नाही ? की दहा टक्के पगार कपात वगैरे नेहमीच्या जुजबी घोषणा करून, मेळावे भरवून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणार आहात ? आपण आज पाकिस्तानशी लढण्याचा पवित्रा घेतला आहे, तो स्वागतार्हच आहे. आपला हा पवित्रा कायम राहणार असला तर या महान् लढ्यात आम्हालाही सहभागी करून घ्या. आमच्याही शक्तींचा उपयोग करून घ्या, आम्हालाही राष्ट्रसेवेची संधी मिळू द्या. यासाठी अशी धोरणे अंगिकारा, असा क्रांतिकारक कार्यक्रम हाती घ्या, की त्यामुळे येथल्या अखेरच्या, तळाशी दबलेल्या भारतीयालाही हे युद्ध आपले वाटेल, आघाडीवर लढणाच्या जवानांच्या पाठीशी तो आपली सारी ताकद उभी करू शकेल. हे क्रांतिकारक पुनर्रचनेचे कार्य गुंतागुंतीचे व आपल्या स्वार्थ

।। बलसागर ।। ५६