पान:बलसागर (Balsagar).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 
 एकविसाव्या शतकाचे महाद्वार !

 

 पाकिस्तान हटाव व गरिबी हटाव हे दोन्ही कार्यक्रम आपण परस्परांना पूरक म्हणून युद्धपातळीवरून एकदमच हाताळले पाहिजेत. यापैकी एकावर भर देऊन दुसरा खुंंटीवर टांगून ठेवण्याची दुष्ट संधी कुणालाही साधू देता कामा " हा जर आग्रह वेळीच धरला गेला नाही, तर युद्धातून अराजक व हुकुमशाही राजवटी जन्मास येतात असा अनुभव आहे. आपण तर लोकशाहीला वचनबद्ध आहोत. ही लोकशाही मूठभर धनिकांची बटिक म्हणून राबवली जात असेल तर देशातील असंख्य गोरगरीब जनता या लोकशाही राजवटीच्या संरक्षणासाठी व या मुळावर आलेल्या पाकिस्तानसारख्या संकटांच्या प्रतिकारासाठी सुसज्ज राहू शकणार नाही. पाकिस्तान हा जगातील बड्या शक्तींचा आशियातील एक अड्डा आहे, तळ आहे. तेव्हा हा तळ एकदा कायमचा उखडून टाकल्याशिवाय भारताला कधीही शांतता लाभणार नाही, लोकशाही मार्गाने आपली उद्दिष्टे साध्य करून घेता येणार नाहीत, जागतिक राष्ट्रमालिकेतील आपले योग्य ते स्थान प्राप्त करून घेता येणार नाही; हे सत्य आपण एकदा नीट ध्यानात घेऊन, त्या आपल्या पुढील पाच-दहा वर्षांच्या ध्येयधोरणांची आखणी केली पाहिजे. चालू भारत-पाक युद्ध (१९७१) बांगला देशाच्या स्थापनेनंतर जरी संपुष्टात आले तरी पाकिस्तानच्यामार्फत भारताच्या विकासाला पुन:पुन्हा खीळ ठोकण्याच्या कारवाया सतत चालूच राहणार आहेत व भारत कधीही एक समर्थ व संपन्न राष्ट्र म्हणून उभे राहू शकणार नाही, अशीही दक्षता बड्या राष्ट्रांकडून नेहमी बाळगली जाणार आहे. तेव्हा सध्याचा भारत-पाक संघर्ष हा व्यापक राष्ट्रीय मुक्तिपर्वातील एक टप्पा समजून पुढेही असे काही टप्पे घेतघेत अखे-

।। बलसागर ।। ५५