पान:बलसागर (Balsagar).pdf/54

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून त्यांची ती मागणी नाकारली गेली. बेग यांच्या वोलण्यावर कितपत विश्वास ठेवावा हे मी माझ्याबरोबर असलेल्या पंडित समाजाच्या एका स्थानिक जाणत्या कार्यकत्र्याला परतताना वाटेत मुद्दाम विचारलेही. त्यानेही बेग यांची भूमिका प्रामाणिक असल्याची ग्वाही दिली. म्हणजेच प्रश्न जातीय नाही. बेग व त्यांच्या सहका-यांना, म्हणजेच शेख अब्दुल्लांना काश्मिर स्वतंत्र राहावेसे वाटते- मग या स्वतंत्र काश्मिरात हिंदू गुण्यागोविंदाने नांदण्यास त्यांची हरकत नाही, आडकाठी नाही. काश्मिर पाकिस्तानात जावे असे वाटणारा दुसरा एक गट आहे व तो अधूनमधून जोरही करीत असतो. दंगली घडवून भारतीय शासन बदनाम करण्याची, काश्मिर शासनाला आतून सतत धक्के देण्याची एकही संधी हा गट वाया दवडीत नाही. पहिले पंधरा दिवस सादिक सरकारविरुद्ध शांततेने चाललेले पडितांचे सत्याग्रह आंदोलन या किंवा यांसारख्या भारतद्रोही गटानेच जातीय वळणावर नेले ही वस्तुस्थिती आहे. या भारतद्रोही कारवायांच्या बंदोबस्तासाठी समथ व कणखर शासन हा जसा एक उपाय आहे तसाच कडवी भारतनिष्ठ लोकसंख्या हाही दुसरा व अधिक खात्रीचा उपाय आहे. आज फक्त काश्मिरातील पाडतसमाजाची भारतनिष्ठा संशयातीत आहे. अशा परिस्थितीत ही संख्या कमी करणाच्या घटनांकडे डोळेझाक करायची, काहीतरी वरवरची मलमपट्टी करून वेळ मारून न्यायची की. कठोर उपाययोजना करून अशा घटनांना आळा घालायचा ? पंडित समाजालाच केवळ संरक्षण देऊन भागणार नाही. भारतनिष्ठ लोकसंख्या काश्मिरात भरपूर प्रमाणात स्थिर केल्याशिवाय काश्मिर केवळ सैन्यबलाच्या जोरावर भारतीय संघराज्यात राहू शकेल. या म्हणण्यात काही अर्थ नाही. भारत सरकार काश्मिरात पोत्याने पैसा ओतून, सादिक-शमसुद्दीन सारखी हुला गादीवर बसवून काश्मिरात भारतीय अस्तित्व टिकवू पाहत आहे. पण हा प्रयत्न अगदी फोल आहे. तुमच्या-आमच्या घामाचा आणि परदेशातून लाचारान भीक मागून आणलेला पैसा काश्मिरात आज अक्षरशः गटारात फेकल्यासारखा वाया जात आहे. सैन्याने आणि पैशाने काश्मिर आपल्याकडे ठेवण्याचा या वीस वर्षातील आपल्या सरकारचा प्रयत्न पूर्ण फसला आहे. या गोष्टीही गतात, पण किती ? तळच फुटका असल्यावर वरून त्यात कितीही पाणी ओतत हन काय मिळणार आहे ? सादिक सरकार खाली खेचून, राष्ट्रपती राजवट जागूनही फार काय होणार आहे ? तळापासून किडलेली, बरबटलेली तेथील करा यत्रणा तशीच कायम राहणार असेल तर राष्ट्रपती राजवटीनेही तेथे काहीच नवीन साध्य होणार नाही.

 यासाठी सीमाप्रांत म्हणून काश्मिरची एक स्वतंत्र नीती यापुढे आखण्यात विला हवी. संशयातीत भारतनिष्ठ लोकसंख्येचे तेथील प्रमाण सतत वाढते ठेवा

।। बलसागर ।। ५३