पान:बलसागर (Balsagar).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

युद्धात कशासाठी मेले ? आमचे जवान कशासाठी लढले ? कोटीकोटी लोकांना अर्धपोटी टेवून, दुष्काळात आणि उपासमारीत ढकलून आमचे अब्जावधी रुपये या काश्मिर खो-यात कशासाठी ओतले गेले आणि अजूनही जात आहेत, हे हडसून खडसून एकदा विचारले पाहिजे.
 प्रश्न पंडितांच्या नोक-याचाक-यांचा नाही-ते तो सोडवायला समर्थ आहेत. प्रश्न जातीय दंगलींचा नाही. ज्यांनी रांची आणि श्रीनगर येथील दंगली एकाच मापाने मोजल्या त्यांच्या राजकीय अकलेची कीवच करावीशी वाटते. इतके सगळे होऊनही काश्मिरातील बहुसंख्य मुसलमान जातीय भावनेच्या आहारी सहसा गेलेला नाही हे आपण ओळखले पाहिजे. पंडित समाजानेही आपल्या परिपत्रकातून, लिखाणा-भाषणातून हिंदु-मुस्लिम ऐक्याचा सतत पहिल्यापासून पाठपुरावा केलेला आहे. एक उदाहरण देतो. अनंतनाग जिल्ह्यातील चुनीगुंद हे एक लहानसे गाव. गावात एक शिवमंदिर होते. या दंगलीत जमावाने त्याची पार मोडतोड केली. पण लगेच या मंदिराच्या उभारणीसाठी निधीही जमवण्याचे काम दुस-या काही लोकांनी हाती घेतले आणि मी चौकशी केली त्या दिवशी निधीचा आकडा पाच हजारांपर्यंत गेलेला होता; ही माहिती पंडित समाजाच्या एका कार्यकत्र्यानेच मला दिली आणि त्याची शहानिशा करून घेण्यासाठी मी अनंतनागला समक्ष जाऊनही आलो. हे निधी जमवण्याचे काम कोणी केले असेल ? शेख अब्दुल्लांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे मिझ अफझल बेग यांची ही कामगिरी. अनंतनाग येथे ते आपल्या राहत्या घरात सध्या नजरकैदेत आहेत. अनंतनाग येथे जाळपोळी करण्याकरता परवा जमाव जमला असता नजरकैदेचे नियम मोडून बेग मशिदीत गेले, त्यांनी भाषणे करून जमावाला शांत केले, ही वस्तुस्थिती नाकारून कसे चालेल ?

 मी बेग यांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानले, दोनतीन तास त्यांच्याशी भरपूर चर्चा केली. बेगम अब्दुल्ला याही त्या वेळी तिथेच होत्या. मी आभार मानल्यावर बेग यांनी पहिलेच वाक्य उच्चारले ते असे : 'Don't think that it was a political stunt. It is our creed.' Gratu gaut हा काश्मिरचा ऐतिहासिक वारसा आहे हे ते पुनः पुनः सांगत होते आणि अगदी शेवटी रस्त्यावर फलंगभर म ला पोचवायला आले तेव्हाही बेग मला हेच सांगत होते- 'कुठल्याही स्त्रीची अब्रू माझ्या डोळ्यादेखत मी लुटली जाऊ देणार नाही. मग ती स्त्री हिंदू असो वा मुसलमान.' सात जूनच्या ख्रिश्चन विरोधी दंगलींनी बेग यांना असेच व्यथित केले होते आणि परवाच्या श्रीनगरच्या दंगली थांबविण्यासाठी ‘मला श्रीनगरात येऊ द्यात, माझ्या अनुयायांना, लोकांना भेटून शांततेसाठी प्रयत्न करू द्यात' अशी त्यांची मागणी असतानाही राजकीय विरोधक

।। बलसागर ।। ५२