पान:बलसागर (Balsagar).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टोळकी, पोलिसी वाहनांच्या सततच्या घिरट्या, शिरस्त्राणधारी सैन्यदलाचे पहारे- श्रीनगरात गुंड आणि पोलीस यांचेच राज्य असावे असे वाटत होते.

अशीच बाहेरून खूप मोडतोड दिसत असलेली,
एक तिमजली उंच हवेली.
सर्व भाग मुसलमान वस्तीचा.
टॅक्सी थांबली.
बाजूचा दरवाजा खूप वाजवला. हालचाल नाही.
हाका मारल्या. वरची एक खिडकी उघडली गेली.
बरोबर चा सोबती आणि खिडकीत उभी असलेली व्यक्ती.
काही खाणाखुणा झाल्या, बोलणे झाले.
बाजूचे लहानसे फाटक जरा वेळाने उघडले गेले.
आवारात सामसूम होती.
आतून पाहिले तरी सगळी दारे, खिडक्या बंद होत्या.
हवेलीचे मागील दार उघडल्याचा आवाज आला.
कुणाची हवेली ही ! हिंदूची की मुसलमानाची !
आपण कोणाला भेटायला चाललो आहोत ?
दरवाजा उघडला,
ही उभी असलेली पुरंध्री कोण ?
काश्मिरचा सुकीर्त गौरवर्ण तो हाच का ?
तो सुविख्यात काश्मिरी लाल गुलाब हाच का ?
झुळझुळीत निळया वस्त्रातील कोण ही ' सुकांत चंद्रानना ?'
कुणी कुलवंताची कामिनी ?'
बघ नकोस चंद्रा वळनी...
तिचा नमस्कार घे. पुढे हो.
डावीकडे, हा लाकडी जिना आहे.
चल वर......

 ती नेहमी गजबजलेली असणारी कुणा रईसाची तिमजली उंच हवेली या वेळी खिन्नतेत बुडून गेली होती. पश्चिमेची सूर्यकिरणे कुठेकुठे रेंगाळत होती तेवढाच काय तो प्रकाश. बाकी अंधार आणि शुकशुकाट, दारातच दिसलेली ती गौरवर्णी बहुधा या हवेलीची मालकीण असावी. थोडेसे हसून तिने

॥ बलसागर ॥ ४७