पान:बलसागर (Balsagar).pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कुणी प्राध्यापक, कुणी सरकारी नोकर, कुणी विद्यार्थी...
 तहाब गावचा सरकारी डॉक्टर सांगत होता-गावात १८ हिंदू कुटुंबे. गावची वस्ती १८ हजार. सगळी मुसलमान. नुकतेच रात्री गुंड घराच्या आवारात शिरले. त्यांनी बागेची उखडाउखडी केली. का, तर म्हणे, डॉक्टरांनी शस्त्रास्त्रांचा साठा जमवलेला आहे, तो हुडकून काढण्यासाठी! धमक्या ही तर रोजचीच बाब आहे;
 - डोक्याला मार बसलेले हे संस्कृतचे प्राध्यापक: कॉलेजमध्ये हिंदू विद्याथ्यवर कसा जाणूनबुजून पक्षपात केला जातो त्याची आकडेवारी सांगताहेत.
 - हा एक सरकारी नोकर! आपल्यापेक्षा कमी शिकलेला, कमी अक्कल असलेला, मागाहून नोकरीला लागलेला कुणी एक, केवळ तो मुसलमान आहे एवढ्याच गुणावर कसा वर चढवला गेला, असे सगळयाच कचे-यात कसे चालू आहे, याचा तपशील हा देत आहे.
 - हा विद्यार्थी : ऑलिपिक सामन्यात हॉकीच्या खेळात पाकिस्तानचा विजय झाला तर कॉलेजच्या मुसलमान विद्याथ्र्यांनी 'पाकिस्तान झिदाबाद' च्या घोषणा देत कशा मिरवणुका काढल्या आणि भारताचा विजय झाल्यावर हिंदू विद्याथ्र्यांनी काढलेल्या मिरवणुकीवर कशी दगडफेक झाली, याच्या आठवणी सांगत आहे.
 - ' परमेश्वरी कशी आहे ? वागायला, चालचलणुकीला ?' मी
 ' चांगली. चांगल्या घरातली मुलगी आहे ती.'
 मी तर ऐकले तुमच्या समाजात मुलीच्या लग्नाला फार त्रास पडतो ! वीस वीस हजार रुपये हुंडा द्यावा लागतो ! त्यामुळे अशा पळवापळवीला अधिक वाव मिळतो, नाही का ?' मी
  खरं आहे. आम्ही हाही प्रश्न चळवळ संपल्याबरोबर लगेच हाती घेणार आहोतच. आहेराची प्रथा बंद केली पाहिजे, महागड्या निमंत्रणपत्रिका काढून उगाच खर्च वाढवू नका हा प्रचार तर आम्ही आतापासूनच सुरू केला आहे -
सर्वांचे एकमत.

 टॅक्सी आली. पहिली आली ती वाटेत सोडावी लागली, कारण ड्रायव्हरचा अंदाज लागेना. दुसरी खात्रीची मिळवायला ब-याच खाणाखुणा, इशारे करावे लागले. कफ्यूची वेळ होण्यापूर्वी जेवढे पाहणे शक्य होते तेवढे पाहून झाले- जळकी दुकाने, पडकी मंदिरे, दगडफेकीच्या खुणा असलेली घरे; त्या स्त्रियांच्या रोज होणा-या प्रार्थनासभा, ती दैनंदिन सत्याग्रहाची पूर्वतयारी, ते रुग्ण, तो दिवसाही । कफ्र्यु असलेल्या भागातील शुकशुकाट, कोप-याकोप-यावर कुजबुजत असलेली ती

।। बलसागर ।। ४६