की त्यात जमाव घुसे. लुटालूट, दगडफेक, मोडतोड ओघानेच आली. काश्मिर पोलीस, गृहरक्षादल यांचा काही उपयोग नव्हता, कारण या कुंपणांनी शेत खाण्याचे हे दिवस होते.
यानंतर कफ्र्यु आलाच. विनोद असा : सर्व हिंदू वस्त्यांचा भाग दिवसभराच्या संचारबंदीने आवळला गेला होता. पण जेथे दंगे उद्भवत होते, जाळपोळ होत होती ते हिंदूंची तुरळक वस्ती असलेले मुसलमान मोहल्ले मोकळेच होते. त्यामुळे लुटालूट, जाळपोळ चालूच राहिली. फक्त कृती समितीला काम करणे अवघड होऊन बसले. आंदोलन अधिकच विस्कळित होण्याची शक्यता वाढली. कारण हिंदु वस्त्यातून रात्रीअपरात्री होणा-या धरपकडीच्या वार्ता बाहेर पडेनाशा झाल्या, रुग्णालयात पडलेल्या हजारो जखमींची विचारपूस, औषधपाणी, जेवणखाण सगळे अनियमित झाले, कार्यकर्त्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला. तरीही रोजच्या पाच जणांच्या तुकडीच्या सत्याग्रहाच्या कार्यक्रमात मात्र खंड पडत नव्हता. मंदिरामंदिरातून हजारो स्त्रिया प्रार्थनेसाठी संध्याकाळी वसत असत-तोही कार्यक्रम व्यवस्थित चालू राहिला. पंडित समाजाचे नैतिक धैर्य खचणे लांबच राहिलेजो तो Now or Never, Thus far & no further, Our struggle for democratic existance या भावनेने पेटून, कुठल्यातरी कामात स्वत:ला गुंतवून घेत होता. बरेचसे प्रमुख कार्यकर्ते तर भूमिगतच झाले होते, कृती समितीच्या अध्यक्षांचाच पत्ता पोलिसांना लागू शकत नव्हता.
धरपकड कशी चालू होती याचा हा एक नमुना. नॅशनल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.जे.एन. मिस्त्री.तीस तारीख. नेहमीप्रमाणे रात्री दहाच्या सुमारास मिस्त्री झोपी गेले. मध्यरात्री 'दीनानाथ', 'दीनानाथ' म्हणून हाका ऐकू आल्या. पाठोपाठ कुंपणाचे दार धक्के मारून उघडल्याचा आवाज आला.व्हरांड्यात बूट खाडखाडले, जिना वाजला. दारावर बुटांच्या लाथा ऐकू आल्या. सान्या घराला जाग आली, चोर-दरवडा असावा अशी प्रथम कल्पना झाली. पण लवकरच भ्रमनिरास झाला. मिस्त्री यांच्या खोलीत घुसलेल्यांपैकी एक सबइन्स्पेक्टर होता व बाकीचे साधे कॉन्स्टेबल्स. मिस्त्री यांचा एम. एस. सी. ला असलेला मुलगा शामसुंदर वडिलांजवळ जाऊन उभा राहिला. त्याची गचांडी धरून पोलिसांनी त्याला बाजूला खेचला. मिस्त्री यांनी आपल्या मुलाला धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. मिस्त्री यांना त्यांच्या पत्नीने आधार दिला. पण काही परिणाम झाला नाही. उलट सब इन्स्पेक्टरने त्या बाईच्याच श्रीमुखात भडकावली व एका पोलिसाने मिस्त्री यांच्या दोन तोंडात ठेवून दिल्या. मागाहून दुस-याने मिस्त्री यांच्या पाठीवर व मांड्यावर लाठ्या घातल्या. धक्के मारीत बापाला व मुलाला खाली आणण्यात आले. तरी