पान:बलसागर (Balsagar).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 इकडे गावात दुपारपासून अशाही अफवा फैलावू लागल्या होत्या की, काही मशिदींना आगी लावण्यात आल्या आणि काही मुसलमानांची घरेही लुटण्यात आली आहेत. एवढे निमित्त पुरे होते. आदल्या दिवशीची पुनरावृत्ती सुरू झाली. दंगली उसळत गेल्या, हिंदू वस्त्यांवर दगडफेक झाली. शिवीगाळ करीत आणि धमकावण्या देत गावभर मुसलमानांचे जमाव धुमाकूळ घालू लागले. रात्र पडली तरी हे अस ह्य प्रकार थांबले नाहीत. काश्मिर पोलिसांचे तर नावच नको. तिथे असलेले पंजाबचे आणि केन्द्राचे पोलीस दलही कुठेच या अर्वाच्य गुंडगिरीला आवर घालताना दिसत नव्हते.

 एक दिवस कसाबसा उलटला आणि दि. २७ ला पुन्हा एकदा पंडित समाजावर गुंडांची आणि पोलिसांची मोठी संक्रांत कोसळली. आतापर्यंत झालेल्या मारहाणीमुळे बरेच लोक अत्यवस्थ होते. प्रथम एक दोघे मृत्यु पावले तेव्हा त्यांच्या प्रेतांची परस्परच विल्हेवाट लावण्यात आली होती. नंतर आणखी दोघे गेले. त्यांची प्रेते नातेवाईकांच्या ताब्यात दिली गेली, कारण बरीच वादावादी या प्रकरणी होऊन चकली होती. दि. २७ ला दुपारी या दोन जणांची मोठी अंत्ययात्रा निघाली व श्रीनरातील बहुसंख्य पंडित समाज यात्रेत मोठ्या दुःखित अंत:करणाने सहभागी झाला होता. “ ॐनमः शिवाय' हा मंत्र, काही भजने यापलीकड यो एवढ्या गंभीर मिरवणुकीतून शब्द उमटत नव्हता. घोषणा कटाक्षाने टाळल्या होत्या. पण नीलम टॉकीजजवळ साध्या कपड्यातील पोलिसांनी आणि गुडानी मिरवणुकीवर पुन्हा एकदम हल्ला चढविला- ' Rain of stone throWIng & lathi charging-' 'दगडांचा आणि लाठ्याकाठ्यांचा पाऊस पडला, अस या हल्ल्याचे वर्णन एका पत्रकात करण्यात आले आहे. शेवटी केन्द्रीय राखीव दलाचे पोलीस मदतीला आले व पांगापांग, पळापळ होऊन जागेवर राहिलेल्या निवडक लोकांनी झटपट अंत्यविधी कसाबसा उरकून घेतला.

 पाठोपाठ छोटा बाजार, नवाब बाजार, चनबल, बाटामूल या मुसलमान वस्तातून जमाव बाहेर पडला आणि त्याने आसपास हिंदू घरांची लुटालूट आणि जाळपोळ करण्यास सुरवात केली. डॉ. पेशिन यांचे औषधी दुकान प्रथम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, कारण आदल्या दिवशी सादिकसाहेबांनी बोलावलेल्या प्रमुख नागरिकांच्या सभेत डॉ. पेशिन यांनी पंडित समाजाची बाजू निर्भिडपणे मांडली ९'ता, हा त्यांचा गुन्हा. एका बेकरीवाल्याचे दुकान जाळण्यात आले-आगीने त्या आसपासच्या दुकानांनाही घेरले. शिवाला मंदिराची मोडतोड व लुटालूट झाली. ९स्पिटलमध्ये जखमींसाठी अन्न घेऊन चाललेली एक जीप अडवण्यात आली आणि अनाची नासाडी केली गेली. आसपासच्या वस्तीतले एखाददुसरे हिंदूघर दिसले

।। बलसागर ।। ४३