पान:बलसागर (Balsagar).pdf/43

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टिकली पाहिज, जातीय सलोख्याची काश्मिरची श्रेष्ठ परंपरा राखली पाहिजे वगैरे वगैरे. ज्याला आपल्या मंत्रिमंडळात सलोखा टिकवता येत नाही त्याचे हे अरण्यरुदन कोण ऐकणार !

 सादिकसाहेबांचे हे अरण्यरुदन कोणी ऐकत नव्हते. एवढेच नाही, तर त्याच दिवशी त्यांच्या कळत वा न कळत सरकारी तिजोरीतील पैसा दगला घडवून आणण्यासाठी गुंडांना, समाजकंटकांना वाटला जात होता, तरी त्याचा काही मात्रा चालू शकत नव्हती, असा पुरावा आता बाहेर पडू लागला आह सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष, काही अधिकारारूढ मंत्री, अनेक पोलीसदलापका काही दले वा त्यातील काही विभाग हे सर्व पाठीशी असताना गुंडांना आता भय कुणाचे ? चोवीसचा दिवस त्या मानाने शांततेत गेला असे म्हणावे एवढया दंगली आता पंचवीसला उसळणार होत्या; त्यासाठी पुरेशा नवीन अफवा पिकविण्यात येत होत्या. चोवीसला श्रीनगरात फक्त गुंड- समाजकंटकांचे जमाव थैमान घालीत होते. पोलीस तटस्थ होते. आता पंचवीसला संयुक्त हालचाली आणि अत्याचारांचे नवे भीषण पर्व सुरू होणार होते. आतापर्यंत फक्त शरीरावर जखमा झाल्या होत्या, रक्त सांडले गेले होते, आता मृत्यूशीच गाठ पडणार होती.
 पंचवीसचा दिवस हा पंधरा ऑगस्टपेक्षाही या आंदोलनातील काळाकुट्ट दिवस म्हणून ओळखला जाणार होता.

 चोवीस ऑगस्टला दिवसभर तुरळक धरपकडी झाल्या पण रात्री पोलि सांना फारच चेव आला. संशयावरून, खाजगी वैमनस्यांवरून कुठल्याही घरावर रात्री-अपरात्री थाप मारावी, वॉरंट असो नसो, अंथरुणातून माणसे ओढून चौकीवर न्यावी, मारहाण करावी हा धुमाकूळ रात्रभर चालू होता. त्यामुळे पंचवीसच्या सकाळपासूनच वातावरण चिताग्रस्त होते. गडबडून, घाबरून गेलेल्या स्त्री-पुरुषांची आंदोलन समितीच्या कचेरीकडे सारखी रीघ लागून राहिली होती. समितीचे कार्यकर्ते तरी कुणाकुणाचे सांत्वन करणार, कुठकुठे धावणार ! त्यांच्यापैकीच पुष्कळजण रात्रीच्या धरपकडीला बळी पडून गजाआड डांबले गेले होते. पण वातावरणच इतके ताणलेले आणि तापलेले होत की, अनाहूत कार्यकर्ते घराघरातून, कचेऱ्या-कचेऱ्यांतून आपणहून या आंदोलना स्वतःला झोकून घेण्यासाठी पुढे सरसावत होते. संघटना नव्हती, कुठल्याही राजकीय पक्षाचे नेतृत्व नव्हते; पण जनतेच्या चळवळीचे हेच वैशिष्ट्य असत की, चळवळीबरोबरच संघटना आपोआप उभी रहात जाते आणि चळवळ जस-

।। बलसागर ।। ४०