पान:बलसागर (Balsagar).pdf/37

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

cribe. I can't describe. माझ्या शेजारीच एक पाकिस्तानी पत्राचा वार्ताहार हे सर्व दृश्य उभे राहून पाहात होता. तोही हात वर करून एकदम किंचाळला होता- 'No. No. This is not in our culture.'_ 'हे आमच्या संस्कृतीत बसत नाही.' त्या दिवसापर्यंत अगदी तटस्थपणे पंडितांच्या आंदोलनाकडे पाहणारा मी एकदम त्याविषयी सहानुभूती बाळगणारा झालो, शासनाच्या मनात काहीतरी काळेबेरे आहे अशी शंका त्या दिवसापासून माझ्या मनात घर करून बसली.'
 पाकिस्तानी वार्ताहारालाही जे पाहिल्यावर असभ्य, नीच, रानटी, माणुसकीला काळीमा आणणारे, मुसलमानी संस्कृतीतही न बसणारे असे वाटले ते आमच्या दिल्लीतील बड्या इंग्रजी पत्रातून कसे छापून आले माहीत आहे ? ‘Police mildly latthicharged-' ‘पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्यसा लाठीहल्ला केला.'
 'असे का चुकीचे छापून यावे ?' मी त्या वार्ताहाराला प्रश्न केला.
 तो हसला. एवढेच म्हणाला, 'तुम्हाला माहीत तर आहे ? माझ्याकडून कशाला काढून घेता?'

 वत्तपत्रे ही लोकशाहीच्या रक्षणाची हमी आहे, जनतेच्या हातातील ते एक महान शस्त्र आहे ... काय राव टिळक-आगरकरांच्या काळातल्या जुन्या बाता अजूनही मारता! वृत्तपत्रे, विशेषतः मोठी पत्रे, हा आज एक व्यवसाय आहे. बाजारात विकत घेण्याची आणि देण्याची ती एक वस्तू आहे. तिची किंमत मोजली का आपल्याला हवा तसा आणि तेवढाच आवाज तिथून निघेल, अशी व्यवस्था करता येते, एवढी साधी गोष्टही तुम्हाला माहीत नाही ?

 हजरतबल मशिदीतील पैगंबरांचा म्हणून मानला जात असलेला एक केस नाहीसा झाला तर याच गुलाबी काश्मिरने पाच-सहा वर्षांपूर्वी केवढा पेट घेतला होता ! दिल्ली केवढी हादरली होती ! आमच्या सौजन्यमूर्ती लालबहादुरशात्रीना श्रीनगरात केस सापडेपावेतो कसा तळ ठोकून राहावे लागले होते ! शमसुद्दीनसाहेबांच्या मंत्रिमंडळाची आहुती घेऊनच हे धडधडलेले कुंड तेव्हा कसे अखेर शात झाले होते, करण्यात आले होते ! आठवतो का हा सारा इतिहास ?

 पंधराशे वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतलेल्या एका थोर प्रेषिताच्या केसासाठी काश्मिर पेटू शकत होते; पण १५ ऑगस्टच्या राष्ट्रीय दिनी, पाकिस्तानी पत्र-

।। बलसागर ।। ३४