पान:बलसागर (Balsagar).pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मध्यवर्ती स्थानाचा शेवटी आश्रय घेतला होता. नेहमीच जिथल्या सचिवालयावर भारतीय राष्ट्रध्वजाबरोबरच जम्मू आणि काश्मिर राज्याचा स्वतंत्र लालध्वज बेमुर्वतखोरपणे डोलत असतो, तेथे निदान १५ ऑगस्टला तरी, निखळ भारतीय निष्ठा प्रदशित करण्याचा कार्यक्रम सहज खपवून कसा घेतला जाणार ? काहीतरी तिखट, झणझणीत, कायमचा. लक्षात राहील असा जबाब पंडितांना दिलाच पाहिजे, जमल्यास सादिकही बदनाम झालाच पाहिजे. पंडितांची खोड मोडावी, राजकारणही साधावे. त्या दृष्टीने मग सर्व तयारी झाली, पोलीसदलाला आवश्यक त्या सूचना दिल्या गेल्या.

 तशी परमेश्वरी आंदोलनाला ११ ऑगस्टपासूनच सुरूवात झाली होती. पाच-पाच पंडितांची एक एक तुकडी रोज सत्याग्रह करीत होती, त्यांना निरोप देण्यासाठी लोक जमत होते, सभा होत होत्या; या सभांवर व क्वचित होणाऱ्या मिरवणुकांवर पोलिसांचे लाठीहल्लेही होत होते. पण १५ ऑगस्टचा रीगल चौकातला सत्याग्रह हे शासनाने आव्हान मानले व कोणतेही प्रक्षोभक कृत्य, एका न्याय्य मागणीसाठी जमलेल्या या हजारोंच्या जमावाकडून घडले नसताना पोलिसांनी जमाव हटवण्याच्या निमित्ताने निर्लज्ज वागणुकीची कमाल केली. माणुसकीला काळीमा आणणारी पोलिसांची ही संतापजनक वागणूक तेथे उपस्थित असणाऱ्या कोणालाही विसरता येणे अशक्य होते. १५ दिवसांनंतर मी श्रीनगरात पोचलो व ज्याला ज्याला म्हणून या घटनेविषयी विचारले, त्याने कधी शरमेने मान खाली घातली, संतापाने भुवई वर चढवली, कधी त्याच्या डोळ्यात एकदम पाणी तरळले. एक अनभवी व दिल्लीतील एका नामवंत इंग्लिश वृत्तपत्राचा वार्ताहार मला सांगत होता- 'त्या दिवसापर्यंत मी या आंदोलनाविषयी तटस्थ होतो. पण त्या दिवशी पोलिसांनी केलेला रानटीपणा पाहून मीही हादरलो, हबकून गेलो. अखेर मीही एक माणूस आहे. वस्तुनिष्ठ वार्ता देणे हे माझे कर्तव्य असले तरी मलाही काही भावना आहेत. न्याय-अन्यायाची चाड आहे. त्या दिवशी गरज नसताना पोलिसांनी केवळ निर्घण लाठीहल्लाच केला असे नाही, कच्चीबच्ची पोरे-स्त्रियांच्या अंगाखांद्यावर असलेली मुलेही–सडकून काढली असे नाही, हवेत अश्रुधूर सुटले, गोळीबार झाला असे नाही; हे मी एकवेळ समजू शकतो. पोलीस बेफाम बरेचदा होतात. पण त्या दिवशी-१५ ऑगस्टच्या या राष्ट्रीय महत्वाच्या दिनी, सुप्रभाती, येथे-या रीगल चौकात- भारतीय स्त्रीत्वाची जी विटंबना करण्यात आली ती मी समजूच शकत नाही. हे कृत्य पूर्वनियोजितच असले पाहिजे. ढकलाढकली, मारपीट तर काहीच नाही. पण कुणाचे केस ओढले गेले, कुणाची वस्त्रे टरकवण्यात आली, नको त्या अवयवांची ओढाताण केली गेली. Even sexual organs were touched. I can't des-

।। बलसागर ।। ३३