पान:बलसागर (Balsagar).pdf/33

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वून नेण्यात आले आहे. तिचा शोध काढून, तिला परत आपल्या स्वाधीन करण्यात यावे, अशी धनवतीची मुख्य मागणी होती.
 दिनांक ५ ऑगस्टला कुमारी परमेश्वरी तिच्याच दुकानात कॅशिअर म्हणून काम करणा-या गुलाम रसूल कांथ या तरुणाच्या घरी सापडली.
 पोलिसांनी आईच्या हवाली करण्याऐवजी किंवा पुढील चौकशीसाठी रैनावारी पोलीस चौकीवरच ठेवून घेण्याऐवजी परमेश्वरीला महाराजगंज या दुस-याच विभागातील एका पोलीस ठाण्यावर हलवली, जो मुसलमान वस्तीचा भाग आहे.
 येथून पोलिसांनी मुलीला एका स्त्री-डॉक्टरकडे तपासणीसाठी पाठवून तिचे वय वीस आहे असे सटफिकेट मिळवले व मुलगी गुलाम रसूलच्या स्वाधीन करून टाकली. पळवण्याच्या आरोपावरून पकडल्या गेलेल्या गुलाम रसूलला जामिनावर आधीच सोडून देण्यात आले होते.
 शालेय नोंदीप्रमाणे मुलीची जन्मतारीख २८ जुलै १९५० ही दिसत असताना व यावरून आज ती १७ वर्षांची अज्ञान आहे हे पुरेसे स्पष्ट होत असताना, डॉक्टरी तपासणीचा हा बेभरंवशाचा आडमार्ग कशासाठी?
 संशयाला येथून सुरुवात झाली.
 डॉक्टरी सर्टिफिकेट हाती पडताच पोलिसांनी आईला असेही सांगून टाकले की मुलीने वीस जुलैलाच इस्लाम धर्माचा स्वीकार केला असून अठ्ठावीस जुलैला गुलाम रसूलबरोबर तिचा रीतसर निकाही लागलेला आहे.
 संशयाची जागा संतापाने घेतली.

 गेले सहा महिने परमेश्वरीच्या बाबतीत अशा संतापजनक गोष्टी वरचेवर घडत होत्या. दुकानात तिचे हिशेब चूक असल्याचे ब-याचदा दाखवले जाई, कॅश कमी पडे, मॅनेजरची बोलणी तिला खावी लागत; कधी कमी पडलेली रक्कम तिच्या नावावर टाकली जाई, कधी कॅशियर गुलाम रसूलच रकमेची भरपाई करी किंवा मॅनेजरसमोर तिला जामीन राही. तिचे हिशेब सर्वात शेवटी घेतले जात व काहीतरी खुसपट काढून तिला दुकानात ब-याच उशीरापर्यंत थांबवले जाई. तोपर्यंत तिच्या घराकडे जाणारी शेवटची बस निघून गेलेली असे आणि दुकानापासून घरापर्यंतच्या साडेचार मैलांच्या रस्त्यावरून रात्रीची सोबत करण्याची संधी गुलाम रसूल सहसा सोडीत नसे. मॅनेजर गिरिधारीलाल वत्त (Watt) परमेश्वरीच्या घराशेजारीच राहत असल्याने कित्येकदा तेच परमेश्वरीला सोबत करीत, ही गुलाम रसूलची अडचण लवकरच दूर झाली–केली गेली असे म्हणतात. श्री. वत्त यांची बदली झाली व त्यांच्या जागेवर श्री. हृदयनाथ हे नवीन गृहस्थ आले. हेही टिकले

।। बलसागर ।। ३०