पान:बलसागर (Balsagar).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 
 सीमोल्लंघन
 


 पंतप्रधान शास्त्रींची ताश्कंदवारीची तयारी सुरू आहे आणि भारत-पाक युद्धाचे पहिले पर्व समाप्त होत आहे.

 या सरत्या वर्षातील भारत-पाक युद्ध ही सर्वात महत्त्वाची घटना. रोमांचकारी आणि स्फूर्तिदायकही. शत्रूच्या प्रदेशावर आपण, थोडी का होईना, चाल करून गेलो आणि आमच्या विशीतिशीतल्या तरुण-तरुण अधिकाऱ्यांनी आणि सर्वसामान्य जवानांनी काही नेत्रदीपक पराक्रम गाजवून आमची मान उंच केली. सेबर जेट्स आणि पॅटन टॅक्स धुळीस मिळविणे ही काही सामान्य मर्दुमकी नव्हे. शत्रुच्या प्रदेशावर चाल करण्याचा आक्रमक पवित्रा आणि आमच्या जवानांची ही मर्दुमकी यामुळे देशात काही काळ एका वेगळ्याच तेजाचा संचार झाला. बाहूबाहुंना एक वेगळेच स्फुरण चढले. राष्ट्रीय चैतन्याच्या या स्वयंस्फूर्त आणि विराट दर्शनाने स्वकीय आणि परकीय-सारेच स्तिमित झाले, भारताचा सन्मान झाला, 'आनंदवनभुवना' चा किचित्सा किचित्काल साक्षात्कार झाला.
 'किंचितसाच, किंचित्कालच. कारण १८।१९ दिवस चालू असणाऱ्या (दि. १ ते १९ सप्टेंबर १९६५) या संघर्षात आपण मिळविले काय आणि गमावले काय याचा आढावा आपल्या दृष्टीने फारसा समाधानकारक नाही. प्रश्न अर्थातच सेनादलाच्या पराकमाचा नसून राजकीय ध्येयधोरणांचा आहे. ही धोरणे नीट तपासून ठरवले पाहिजे की, या संघर्षाचे फलित काय ? या संघर्षातून काय साधायचे ठरले होते, ते कितपत साध्य झाले, जे ठरले होते तेच मुळात चूक की बरोबर !

।।बलसागर ।। १४