पान:बलसागर (Balsagar).pdf/155

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 

 सामर्थ्य आहे चळवळीचे

 

 १८ जुलै १९८३. म. फुले यांनी लिहिलेल्या 'शेतकऱ्याचा आसूड' या ग्रंथाला या दिवशी शंभर वर्षे पूर्ण झाली. पुण्याच्या साहित्य परिषदेत या निमित्ताने सभेचा एक कार्यक्रम योजला गेला होता. वक्ते होते प्रा. गं. बा. सरदार आणि प्रा. वि. म. दांडेकर. दांडेकरांनी फुल्यांच्या ग्रंथाची थोडक्यात ओळख करून दिली तर गं. बा. सरदार यांनी ग्रंथातील सर्व विचार सध्या लागू पडत असलेनसले तरी फुले यांच्यापासून प्रेरणा घेणे महत्त्वाचे आहे, विभूतिपूजा टाळली पाहिजे असे सांगितले.

 शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेला ब्राह्मणांची पुरोहितशाही व सरकारी नोकरांचा भ्रष्टाचार कारणीभूत आहे, असे फुले यांचे त्या काळचे प्रतिपादन आहे. सावकारशाहीचा उल्लेख फुले यांनी केलेला आहे; पण या शाहीवर म. फुले यांच्या आसुडाचे वळ उठलेले नाहीत. याचे एक कारण, बहुसंख्य सावकार गुजर, मारवाडी-जैन वगैरे ब्राह्मण नसलेल्या समाजातील होते, हे असावे, असेही ग. बा. सरदारांनी आपल्या भाषणाच्या ओघात सूचित केले.

 कार्यक्रम आटोपल्यावर पूर्वाश्रमीचे एक कम्युनिस्टविचारी, सध्या इंदिरानुकूल असलेले एक ज्येष्ठ व निवृत्त पत्रकार म्हणाले, 'शरद जोशी सध्या यापेक्षा वेगळे काय सांगत आहेत ?'

 शरद जोशींच्या विचारांची-चळवळीची महाराष्ट्राला सर्वप्रथम ओळख करून देणाऱ्या 'योद्धा शेतकरी' या विजय परुळकर लिखित पुस्तकाच्या शेवटी,

।। बलसागर ।। १५६