पान:बलसागर (Balsagar).pdf/151

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 

 हा प्रवाह आला कोठून ? आणला कोणी ?

 

 जनता पक्षाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर यांची कन्याकुमारी ते दिल्ली ही भारत यात्रा महाराष्ट्रात पोचली आहे. येत्या आठवड्यात ती पुण्यास येत आहे. यात्रेकरूंचे स्वागत मोठ्या प्रमाणावर करण्याची पूर्वतयारी सुरू आहे. निवडणुका जवळ येत असल्याने जो तो पक्ष लोकांच्या डोळ्यांसमोर राहण्याचा प्रयत्न करणार, हे उघड आहे. जनता पक्षाजवळ संघटना नसल्याने या पक्षाने या चंद्रशेखर-यात्रेचा असा उपयोग करून घेतला तर त्यात वावगे काहीच नाही. यात्रेतून पक्ष जरी बलवान झाला नाही तरी चंद्रशेखरांचे व्यक्तिमत्त्व एका अखिल भारतीय पातळीवर यामुळे पोचू शकते. जयप्रकाशांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हे व्यक्तिमत्त्व आजवर वाटचाल करीत आलेले आहे. ७७ मध्ये पक्ष नसला, संघटना नसली तरी जयप्रकाशांच्या व्यक्तिमत्त्वामुळे व आणीबाणीविरोधी वातावरणामुळे जनता पक्ष विजयी झाला, इंदिरा गांधींचा पराभव होऊ शकला. असे व्यक्तिमत्त्व आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी उपलब्ध नाही. ही उणीव भरून काढण्याचा चंदशेखरांचा व त्यांच्या अनुयायांचा-सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे. केवळ इंदिरा गांधीच व्यक्तिनिष्ठ राजकारण करतात असे नाही. एकूण भारतीय राजकारणाची प्रकृतीच व्यक्तिनिष्ठ आहे. पूर्वीही काँग्रेसमध्ये टिळकयुग, गांधीयुग, नेहरूयुग अशी व्यक्तिनामांकित युगेच होती. हिंदूसभा म्हणजे सावरकर हे समीकरण होते. भाजपजवळ अटलबिहारींसारखा अखिल भारतीय मान्यता व लोकप्रियता असलेला नेता आहे. शिवाय संघटना बांधणीसाठीही हा पक्ष प्रयत्नशील असतो. असे काही ठोस भांडवल जनता पक्षाजवळ म्हणजेच पूर्वाश्रमीच्या समाजवादी पक्षा-

।। बलसागर ।। १५२