पान:बलसागर (Balsagar).pdf/139

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुरुजींनीच केलेला आहे. श्रीकृष्णाने हे वेळच्या वेळी केले नाही म्हणून यादवांच्या लीला त्याला पाहाव्या लागल्या असा मार्मिक अभिप्रायही गुरुजींनी या संदर्भात व्यक्त केला आहे. समाजधारणेचा हा खास भारतीय आदर्श आहे, गांधीजींचा लोकसेवकसंघाचा विचार हा भारतीय प्रतिभेचाच एक श्रेष्ठ आविष्कार आहे असे म्हणणारे गुरुजी आज कुणी विचारात घेवोत न घेवोत ; इतिहासात त्यांचे योगदान निश्चित नोंदले जाईल, कारण गांधीजींनाही मनात असून जे जमले नाही, करता आले नाही, ते या संन्यस्त सरसंघचालकाने करून, जमवून दाखवले आहे. संघ आज प्रचंड सामर्थ्यानिशी उभा आहे तो या आधुनिक यतींच्या खांद्यावर. दिल्लीत किंवा मुंबईत कुणी दोन-चार संघवाले मंत्री आहेत, सत्ताधारी आहेत म्हणून नव्हे. याच संघ-सामर्थ्यावर मोहित होऊन जयप्रकाशांनी त्याला मनःपूर्वक सुशय चितिले आहे, आशीर्वादही दिला. जयप्रकाश म्हणाले -

 "बांगला देशापासून पाकिस्तानपर्यंत आपण एक राष्ट्र आहोत असे मी मानतो. आमची राज्ये भिन्नभिन्न असू शकतात. हजारो वर्षांपासून भारतात अनेक राज्ये होती. तरीही आमचे राष्ट्र मात्र भारतीय होते. काही गोष्टी नाहीशा होत नाहीत अशा असतात. उर्दू व फारसीचे सुप्रसिद्ध कवी इक्बाल यांनी स्वत:च असे म्हटले आहे की, 'कुछ बात है कि हस्ती मिटती नही हमारी.' (काही गोष्टी अशा आहेत की आमचे अस्तित्व नष्ट होत नाही) तर मित्रांनो, ही गोष्ट त्यांपैकीच आहे आणि तीच गोष्ट आपल्याला धरून ठेवायची आहे. कारण तीच आमच्या दृष्टीने सर्वात मौल्यवान आहे. आज तीन राज्यांत (भारत, पाकिस्तान बांगलादेश) विभाजन झाल्यावरही या तीन राज्यांत सर्वात मोठे राज्य कोणते असेल तर ते भारतच ! आमचा व्यवहार, आमचे आचरण असे असले पाहिजे की, आपले पूर्व आणि पश्चिम असे जे दोन तुकडे झाले आहेत त्यांची हृदये आपल्याला जिंकता आली पाहिजेत. ती राज्ये वेगळी राहावीत. भारतातही अनेक राज्ये आहेत. तरी आपली भारतीयता कायम राहिली पाहिजे. ज्याप्रमाणे हिंदू भारतास आपला मानतात, तसेच त्यांनीही भारताला आपले मानावे या दृष्टिकोनातून आपणास काम करावयाचे आहे.

 "आपण संयमी आहात, आपण गुणसंपन्न आहात आणि माझी अशी अपेक्षा आहे की, आपण भारताला नवे रूप द्या. मनुष्य आणि मनुष्यबंधू असावेत, उच्चनीच भेद असू नयेत असा भारत बनवा, असा एक वृद्ध या नात्याने माझा आपणास आशीर्वाद आहे. गरीब व श्रीमंत असा भेद नाही ही गोष्टही शक्य आहे व तीही झाली पाहिजे. गरिबी नाहीशी करणे कठीण आहे ते काही एक-दोन दिवसांत शक्य नाही, हे ओळखूनही काम केले पाहिजे. ज्या घरात लहान मुले अर्धपोटी राहून दुःखित अंत:करणाने रात्री झोपी जातात, अशी किती तरी

।। बलसागर ।। १४०