पान:बलसागर (Balsagar).pdf/12

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 
 स्मरण
 

 “ प्रत्यक्ष यशाचा आणि राजकीय मुत्सद्देगिरीचाच फक्त निकष लावला तर स्टॅलिनच्या आसपास त्याच्या कालखंडातील क्वचितच कोणी व्यक्ती पोहोचू शकेल, याबद्दल मला शंका नाही.
 “ मी अर्थातच असे मानीत नाही की, यश हा एकच निकष राजकारणात मानण्यात यावा. साधनांची शुचिता राजकारणात अवश्य पाळली गेली पाहिजे. सामान्य नीतितत्त्वे राजकारणात पायदळी तुडविली जाणे नेहमीच संभवनीय असते, कारण 'अस्तित्वासाठी सतत चढाओढ' हे त्याचे नित्याचे स्वरूप असते. पण मी त्याच राजकीय पुढाऱ्यांना आणि मुत्सद्यां ना थोर समजतो की, जे व्यवहार आणि ध्येयवाद यांची सांगड घालू शकतात व मूलभूत नीतिमूल्यांची योग्य ती कदर ठेवूनही आपल्या ध्येयाकडे निश्चित वाटचाल करू शकतात .."

–मिलोव्हन जिलास-Conversations with Stalin


 पंडित नेहरूंच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या चरित्राचे व कार्याचे यथायोग्य मूल्यमापन होण्यास अद्याप बराच कालावधी जावा लागेल. खूप माहिती व घटना अप्रकाशित आहेत व अवश्य ती वस्तुनिष्ठताही इतक्या जवळच्या काळात धारण करणे अनेक कारणास्तव शक्य नसते. त्यातून पं.नेहरूंचे जीवन हे एकसुरी व समन्वित जीवन नव्हते. निरनिराळ्या काळी निरनिराळ्या प्रेरणांचा, विचारांचा पगडा त्यांच्या मनावर असे आणि या सर्व विविध प्रेरणांचा आणि विचारांचा समन्वय साधणे त्यांना अखेरपर्यंत जमू शकले नाही. किंबहुना असेही म्हणता येईल की, त्यांचा स्वतःचा किंवा सत्याचा शोध शेवटपर्यंत अखंडपणे चालूच

।। बलसागर ।। ७