पान:बलसागर (Balsagar).pdf/117

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खड्गहस्त हा नावापुरताच खड्गहस्त राहतो. तरीपण कुणी हस्तच छाटून टाकीत नाही. प्रादेशिकतेच्या प्रवाहात वाहून जाणे हे असे हात छाटून टाकण्यासारखे आहे. महाराष्ट्रात तरी अशा अविचाराला वाव मिळू नये. राष्ट्रीय प्रवाहाचे विस्मरण निदान महाराष्ट्राला तरी न व्हावे.

जानेवारी १९८३

।। बलसागर ।। ११६