पान:बलसागर (Balsagar).pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अंत:करणामार्फत पोहोचविण्याचे प्रयत्न का होत नाहीत ? अराष्ट्रीय व असामाजिक प्रवृत्तींचा कणखरपणे बिमोड होत आहे का ! या दिशेने आमचे प्रयत्न झाले तरच निर्गुण, निराकार जनतेतून सगुण, साकार असा ‘राष्ट्रीय समाज' स्वाभाविकपणे विकसित होईल. असा स्वाभाविक विकास हाच आजच्या सामाजिक विघटनेवरील व राजकीय दौर्बल्यावरील एकमेव तोडगा आहे.


ऑगस्ट १९६२

।। बलसागर ।।६