पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
योग्य पर्याय निवडा
योग्य पर्यायावर (✓) अशी खूण करा

१) खरं म्हणजे गटाचा नियम की गटात आलं नाही तर ५ रु. दंड भरायचा. भीमा गटप्रमुख होती. तीच सारं गटाचं काम बघायची, एकदा ती बैठकीला आली नाही तर, तिच्याकडून दंड घ्यायचा का? तुम्हाला काय वाटतं?
१) काम केल्याचे पैसे भीमा घेत नाही म्हणून तिने दंड भरू नये.
२) गटात सर्वांना नियम सारखे. म्हणून तिने दंड भरावा.
३) ती का आली नाही, ते विचारावे. त्यावर निर्णय ठरवावा.
४) तिला गटप्रमुख करू नये.
२) राधाबाईची गटबैठक चुकली असं कधी झालं नाही. पण एकदा तिची लेक घरी बाळंत झाली म्हणून ती गटात आली नाही. तर भामा म्हणते, तिने दंड भरला पाहिजे. तुम्हाला काय वाटते?
१) तिने दंड भरावा, कारण गटाचा तसा नियम आहे.
२) तिने दंड भरू नये, कारण घरी महत्त्वाची अडचण होती.
३) तिने पैसे पाठवून द्यावेत, पण दंड भरू नये.
४) तिच्याच घरी गट घ्यावा.
३) गटातल्या दोघींची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यांना अर्थसाहाय्य लागायचे नाही. त्यांनी गटाचा अंतर्गत वाटपाचा व्याजदर ४% ठेवावा, असे म्हंटले. काय करावे?
१) व्याज दर ४% ठेवावा.
२) गटाने व्याजदर सर्व संमतीने ठरवावा.
३) कोण्या एका- दोघींच्या फायद्यासाठी गट नाही, हे दोघींना पटवून सांगावे.
४) सर्वांना परतफेड करता येणे शक्य होईल असा दर ठेवावा.
४) सावित्रीबाई गटप्रमुख आहेत. दरवेळी गटात शिल्लक राहिलेली रक्कम त्या त्यांच्याजवळच ठेवतात. त्यांनी काय करावे?
१) रक्कम शिल्लक राहिल्यास बँकेत भरावी.
२) स्वत:कडे ठेवून पुढील महिन्यात सर्वांसमोर जमा करावी.
३) ती परस्पर कोणाच्यातरी नावावर लिहावी.
४) स्वत:च्या नावावर कर्ज म्हणून घ्यावी.
५)गावातल्या श्यामच्या पोरीचं लग्न होतं. श्यामला आज पैसे हवे होते. गट बसायची वेळ होती. श्यामच्या घरातल्या कुणाचंही खातं गटात नव्हतं तरी तो गटात आला. ५०००/- रुपयांचं कर्ज द्या, म्हणाला.
१) श्यामला कर्ज द्यायचं.
२) श्यामला कर्ज द्यायचं नाही.
३) श्यामला जास्त व्याजानं कर्ज द्यायचं.
४)श्यामला गटाचं सभासद करून कर्ज द्यायचं.

* * * * *
१५