पान:बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf/२९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४२ ८.५१ १५०
१५९ ९.५६ १६९
१० १६९ १०.१३ १७९
११ १७९ १०.७४ १९०
१२ १९० ११.३९ २०१
२ आर्थिक साक्षरतेच्या पायऱ्या

 १ बँकेत खाते काढणे: बँकेत खाते काढले की पैसे बँकेत पैसे ठेवायचे. गरजे पुरते काढायचे त्यामुळे पैसे सुरक्षित रहातात हे जेवढे खरे असते तेवढेच आपले पैसे आपण वापरत नसतो तेव्हा इतरांना वापरायला मिळतात त्यामुळे आपल्या पैशावर व्याज मिळवता येते. जर पैसे नक्की लागणार नसतील तर ते नेहेमी मुदत ठेवी मध्ये गुंतवून ठेवावेत त्याला बँक जास्त व्याज देते.
 २ बचत करणेः कितीही कमी मिळकत असली तरी बचत करायला शिकायला हवे. ही बचतीची सवय आपल्याला पुढे खूप उपयोगी पडते. जेवढी लहानवयात आपण बचत करू तेवढी कमी रक्कम बचत केलेली पुरते.
 ३ विमाः अचानक आलेल्या संकटाला तारून नेण्यासाठी विमा काढणे जरूरीचे आहे. विमा अपघातात होणा-या हॉस्पिटलसाठीच्या खर्चाचा असू शकतो किंवा अचानक मृत्यू आला तर मिळणारा परतावा असू शकतो. कधी पिकाचा असू शकतो किंवा अगदी चोरीचा किंवा वाहनाच्या अपघाताचा सुद्धा असू शकतो. आपण एक लक्षात घेऊया कि विमा म्हणजे गुंतवणूक नाही. कधी कधी लोकं विचारतात कि ‘वर्षाचा हप्ता ५00 रु भरला होता पण काहीच झालं नाही म्हंजे गेले ना वाया!' तर तसे नसते. चुकून गरज पडली असती तर?.... विमा नसेल तर २५००० खर्च आला असता तो ५०० रुपये देउन भागवला हे आश्वासन हीच सुरक्षा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अचानक काहीही घडू शकते त्याला अचानक पैसे पडू शकतात असा विचार करून विमा काढणे शहाणपणाचे लक्षण आहे. अचानक खर्च करावा लागला कि चांगले चांगले चाललेले संसार कोलमडून पडतात. तसं होउ नये