पान:बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf/२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ते बाराव्या महिन्याला १०१% होते! याचा अर्थ ६% महिन्याला या दराने एक वर्षानंतर दहा हजार रुपयावर व्याज दहा हजार शंभर रुपये मिळते. चक्रव्याढ दराने म्हणजे व्याजावरच्या व्याजाने किती फरक पडतो बघा. आपल्याला या चक्रव्याढ व्याजाच्या ताकदीचा अंदाजच येत नाही. जशी जशी टक्केवारी वाढत जाते तसं तसे व्याजा वरचे व्याजही वाढत जाते. म्हणजे ६% दर महाचा दर १ % ने वाढून ७% महिना केला तर वर्षभरात १२५% व्याज मिळते (शंभर रुपया वर वर्षाच्या शेवटी व्याज १२५ व मुद्दल १०० असे २२५ मिळतील)
 हेच दहा हजार आपण जर राष्ट्रीय बँकेत ठेवले तर सध्या बँका गुंतवणुकीवर दर वर्षाला दर शंभराला ६.२५ रुपये देतात. म्हणजेच ६.२५% बँकांचा हा व्याजदर शंभर रुपयाला वर्षभर ठेवले तर वर्षानंतर मिळणारा असतो म्हणजे वर्षाच्या शेवटी दहा हजाराच्या गुंतवणुकीला बँक ६४३ व्याज देते. (व्याजा वरचे व्याज धरल्याने ६२५ पेक्षा जास्त मिळते), रीतसर मार्गाने मिळणा-या या ६४३ रुपया ऐवजी कोणी १०००० देतो म्हणत असेल तर मोह तर होणार पण या व्यवहारात मुद्दलच बुडायचा धोका आहे हे लक्षात ठेवा. कारण असा कुठलाच उद्योग नाही की जो दर महिन्याला ६% परतावा देउ शकेल. कायम लक्षात ठेवा की यशस्वी उद्योग करायचा असेल तर महिन्याला १ ते १.२% या पेक्षा जास्त दराचे कर्ज परवडत नाही बँकांनी असा विचार करूनच असा व्याजदर ठरवलेला असतो. त्यामुळे रचनेतल्या पतसंस्था किंवा सहकारी बँका सुद्धा परवडणाऱ्या दरानेच कर्ज देतात. बचतीवर कोणी जास्त परतावा देत असेल तर धोकाही तेवढाच जास्त आहे हे समजून घ्या

महिना वाढत जाणारे मुद्दल व्याज एकूण
१०० १०६
१०६ ६.३६ ११२.३६
११२ ६.७४ ११९
११९ ७.१४ १२६
१२६ ७.५७ १३४
१३४ १४२