हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रशिक्षण ८
विधान चूक का बरोबर ते लिहा
खालील विधानांतील चूक विधानानंतरच्या चौकटीत x अशी व बरोबर
विधानानंतरच्या चौकटीत ✓ अशी खूण करा.
१. सावकार जसा माझा दागिना सांभाळतो, तशी मी जमा केलेली रक्कम
बँक त्याच नोटांमध्ये सांभाळते. ☐
२. बँकेचा मॅनेजर हा बँकेच्या जागेत मॅनेजर असतो. तो कुठेही भेटला
तर बँकेचे व्यवहार करत नाही. ☐
३. चेक /धनादेश हा त्यावर लिहिलेल्या तारखेनंतर ६ महिन्यांपर्यंत
बँकेत भरला तरी चालतो. ☐
४. बँकेचे पासबुक जपून ठेवावे कारण ते हरवले तर खात्यातील पैसे
बँकेत जमा होतात ☐
५. बँकेतून कर्ज ११ ते १३.५% दराने मिळते तर गटातून २% दराने
याचाच अर्थ गट बँकेपेक्षा खूपच कमी दरात कर्ज देतो.☐
६. बँकेची निर्णयकर्ती अधिकारी महिला असू शकते. ☐
*****