प्रशिक्षण ७
१) भाग्यश्रीची का सोनालीची खालील प्रसंग वाचून त्यावर चर्चा करा.
शिन्देवाडीतील भाग्यश्रीने बँकेत खाते काढायची तिची तयारी नाही असे
सांगितले. तिने बँकेविषयी काही गोष्टी ऐकल्या होत्या त्या ती सांगू लागली.
भाग्यश्रीः मी बँकेत खाते काढत नाहीये कारण.......
१) माझ्या खात्यावर किती पैसे आहेत ते सगळ्यांना कळेल.
२) माझ्या घरातील लोक माझ्या नकळत माझ्या खात्यावरचे पैसे
काढतील.
३) माझ्या मैत्रिणीने त्या बँकेतून कर्ज काढले तर बँक माझ्या
नकळत मला जामिनदार करेल.
सोनालीः तेव्हा बँकेची कामे करण्याचा खूप अनुभव असणारी सोनाली तिला
म्हणाली बँकेचे व्यवहार पारदर्शक असले तरी खातेदाराच्या माहितीबद्दल
गुप्तता पाळली जाते. खातेदाराच्या न कळत आणि त्याची संमती नसताना
बँकेतील सदस्य :-
१) खातेदाराची बचत किती हे कोणाला सांगू शकत नाही.
२) खातेदाराच्या स्वाक्षरीशिवाय कोणीही त्याच्या खात्यातून पैसे
काढू शकत नाही.
३) खातेदाराच्या संमतीशिवाय त्याला कोणत्याही कर्जासाठी
जामीन धरू शकत नाही.