प्रशिक्षण ५
१) कमलने बँकेत जमा केलेल्या नोटांवर खुणा करून ठेवल्या होत्या.
ज्यावेळी तिने बँकेतून पैसे काढले तेव्हा तिच्या लक्षात आले की तिने ज्या
१००च्या आणि ५००च्या नोटा बँकेत ठेवल्या होत्या त्या ह्या नव्हत्याच.
भलत्याच कोणाच्यातरी नोटा तिला मिळाल्या होत्या. काय घडले होते?
अ) बँक मॅनेजरने भलत्याच व्यक्तीच्या नोटा कमलला दिल्या
होत्या.
ब) बँकेत ठेवलेले पैसे बँक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवते, ते
चलनात येतात त्यामुळे कमलला त्याच नोटा मिळतील असे
नाही, परंतु,जेवढे पैसे ठेवले आहेत ते मिळू शकतील.
क) खरे तर कमलला तिच्याच खूणा केलेल्या नोटा मिळायला
हव्या होत्या.
ड) कॅशियरच्या हातून चूक घडली.
२) मंगलला २०००/-रूपयांचा चेक मिळाला होता. तो तिच्या नावाकर
काढलेला पहिलाच चेक होता. ती अगदी हरवून गेली होती. पण त्या चेकवर
डाव्या कोप-यात दोन तिरक्या रेषा काढलेल्या होत्या. ती हिरमुसली. काय
होता त्या तिरक्या समांतर रेषांचा अर्थ? त्याचा अर्थ----
अ) की हे पैसे फक्त मंगलच्याच खात्यात जमा व्हावेत.
ब) चेक लिहिल्यावर चुकून कोणीतरी तशा रेषा काढल्या होत्या.
क) चेक चुकीचा होता.