एकदा सरूबाई बँकेत काम होतं म्हणून गेली. तिथे जाऊन बसली आणि
वेळ संपला म्हणून काम न करताच परत आली. तिला विचारलं “काम का नाही
केलंस?" तर म्हणाली “मी तिथे पहिल्यांदाच गेले होते तर मला कुणी विचारलंच
नाही की काय काम आहे तुझं? मग मी काम कसं सांगायचं?" त्याच बैठकीत
रखमानं सांगितलं की माझ पण काम झालं नाही कारण आमच्या जातीचा
कोणी पुरूष बँकेत नव्हता. मग पर-पुरूषाशी कसे मान वर करून बोलायचे?
तिचं ‘बाईपण' आडवं आले..... आता काळ बदलला आहे, बायका
समाजात पुरूषाच्या बरोबरीनं काम करतात पण या बदलांना सामोरे
जाण्याची संधी सगळ्यांना सारख्या प्रमाणात मिळतेच असे नाही. त्यामुळे
बचतगटातील सभासदांना बँकेचे काम पाहायला एखाद्या दिवशी न्यायचे.
त्यांना बँकेत चाललेली कामे पाहायला सांगायची. याचा नक्की उपयोग होतो.
बँक हे काही घर नाही. ती आपल्यासाठी केलेली एक व्यवस्था
आहे. तेथे गेले की आपण आपले काम करायचे. अडचण आली तर
बँकेतील कर्मचा-यांना विचारायचे असते. बँकेमधील सर्व कर्मचा-यांना बँकेत
करावयाची सगळ्याप्रकारची कामे येतच असतात. ती कामे ते आलटून
पालटून करतात. त्यामुळे खिडकीतील माणूस बदलला तरी आपले काम
होते. माणूस बदलला तरी आपले कागद, पैसे सर्व सुरक्षितच राहते. त्यांना
काम करण्यासाठी टेबल व केबीन असल्यामुळे त्यांचा फक्त चेहरा आपल्याला
दिसतो. ही व्यवस्था मुद्दाम सुरक्षिततेसाठी असते. काम करण्याच्या
भागात सगळ्यांचा प्रवेश झाला तर गोंधळ होईल. तो टाळण्याकरीता
असे करावे लागते. कारण खूप संख्येने माणसे बँकेत येत राहतात.
गावात बचत गट सुरू झाल्याची बातमी तान्हुबाईला वाडीवर कळली