पान:बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 या चेकचे पैसे मिळणार! जर तो चेक मी क्रॉस न करता दिला असता तर मात्र माझ्या बँकेने तुला पैसे लगेच दिले असते. या बघ, डावीकडे दोन रेषा मारल्यात म्हणून त्याला 'क्रॉस' म्हणतात. जेव्हा अशा रेषा नसतात तेव्हा आपण चेक लिहिणा-या खातेदाराच्या बँकेत गेलो तर ज्याच्या नावाचा चेक आहे त्याला लगेच पैसे मिळतात.
 पण असा बेअरर चेक हरवला तर चो चेक ज्याला मिळेल तो कोणीही पैसे काढू शक्ण्याची भिती असते , असा धोकाही त्यात असतो ! म्हणून चेक नेहमी क्रॉस केलेला बरा! हो, पण गटातल्या बायांची खाती नसतील तर त्यांना बेअरर चेक दे. नाहीतर सांगशिल हुनुतात्यानं सांगितलंय नि मग येईल मोर्चा माझ्या लॉजवर!"
 आता शारदाला सारं उलगडलं. बँक मॅनेजर बरोबर सांगत होते. चेक तिच्या खात्यावर भरूनच यायला हवा होता. म्हणजे पुढे गेला असता. आता पुन्हा बँकेत एक हेलपाटा मारणं आलं...... चेकची स्लिप भरणं आलं...... असं म्हणत शारदा घराकडे परतली.

  •  चेकच्या डाव्या वरच्या कोप-यात तिरप्या दोन रेषा काढलेल्या असल्या की त्याला चेक 'क्रॉस' करणे असे म्हणतात. ज्याच्या नावाने हा चेक असतो फक्त त्यालाच त्याच्या खात्यात क्रॉस चेक भरता येतो. सुरक्षिततेसाठी असा क्रॉस चेक देतात.
  •  'बेअरर' चेक याचा अर्थ क्रॉस नसणारा चेक या चेकवर ज्याचे नाव लिहिले आहे, त्याला त्या चेकवरील रक्कम ज्याने चेक लिहिला आहे, त्याच्या बँकेत गेले असता रोख मिळते. जर असा चेक हरवला आणि दुस-या कोणाच्या हातात पडला तर ती व्यक्ती त्या चेकवरील पैसे काढू शकते. याचाच अर्थ आपल्या किंवा गटाच्या नावाने मिळणारा चेक हा क्रॉस चेकच असावा असे आपण म्हंटलं पाहिजे. बेअरर चेक डावीकडे तिरप्या दोन रेषा मारून आपणही क्रॉस करू शकतो. म्हणजे ज्याला/जिला चेक देऊ तिच्या खात्यातच तो जमा होऊ शकतो.