पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/32

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


बेळगावमध्ये इव्हानला कोणी ओळखत नाही. अगदी गणेशपूरमध्येही. इतक्या टोकाच्या प्रसिद्धीविन्मुख इव्हानला मी याचं रहस्य विचारलं तर त्यांनी अनेक कटू प्रसंग सांगितले. त्यापेक्षा तक्रार नसलेल्या, तक्रार न करणाच्या माणसात तिला राहणं आवडतं! तिची मात्र कुणाबद्दल तक्रार नाही. 'आय अॅम डुईंग माय जॉब! फिनिश!!' असं म्हणून त्या अबोल राहतात. त्यांचं मौन मला जास्त बोलकं वाटलं... वाटतं.

☐☐

प्रेरक चरित्रे/३१