पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उपेक्षितांची प्रेषित : इव्हान लोमेक्स

मदर इव्हान लोमेक्स. वय ५७ तीन मोठ्या हृदयशस्त्र क्रियेमुळे विदीर्ण हृदय, अर्धशिशीचा विकार गेली अनेक वर्षे सोबतीला. हे सर्व कमी म्हणून बाल दम्याची नित्याची साथ सांगत. पती निवर्तल्यापासून आयुष्याची एकाकी लढत. पदरात अपंग आई. हाडात सळ्या ठोकून डॉक्टरांनी उभी केलेली. प्रौढ वयात केलेलं लग्न. कूस उजवायचा सोस म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध जाऊन इव्हाननी कन्येला जन्म दिला. कन्यारत्नाने आणखी एक संकट पदरी घातलं. ती जन्मतः मतिमंद, मंगोल. अवघी चार फुटी नेडन १८ वर्षांची आहे हे सांगूनही खरं वाटत नाही.
 भरीस भर म्हणून मदर इव्हान निराधारांचा सांभाळ करतात हे कळल्यावरून एके दिवशी दाराच्या पायरीवर ठेवलेलं अज्ञात अर्भक. तेही कन्यारत्नच. पामेला तिचं नाव. अपहणाचं बालंट माथी नको, म्हणून इव्हाननी पामेलाला रीतसर दत्तक घेतलं, चक्क जाहीर सूचना देऊन. आणखी एके दिवशी एक मधुमेहग्रस्त रेणुका इव्हानच्या पदरात पडली. तिला रोज इन्शुलीन द्यावं लागतं. इन्शुलीनचा खर्च न परवडणाच्या गरीब आई-वडिलांनी भूमिगत राहून तिला इव्हानच्या हवाली करणं श्रेयस्कर मानलं. या सा-याचं दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात उपसतही इव्हान थकत नाही.

 पतीच्या निवृत्तीवेतनातून येणा-या पैशात बेळगावच्या गणेशपूरमध्ये चार खोल्यांचे घर घेऊन रस्त्यावर मरणासन्न पडणाच्या प्रत्येक निराधाराला

प्रेरक चरित्रे/२७