पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तारा बेग यांच्या या कार्याची दखल घेऊन जिनिव्हाच्या आंतरराष्ट्रीय बालकल्याण संघटनेच्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. या निवडीमुळे त्यांना जागतिक पातळीवर बालकांच्या विविध समस्यांचा अभ्यास करण्याची संधी लाभली.

 तारा बेग यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्त्र होते. समाजसेवक, लेखक, समीक्षक, प्रचारक इत्यादी विविध भूमिकेतून त्यांनी कार्य केले. त्यांनी लिहिलेले ‘पोट्रेट ऑफ अॅन इरा' हे पुस्तक बरेच गाजले. या रेखाचित्र संग्रहात त्यांनी नेहरू, टाटा, राजदूत, महाराजे इत्यादीची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. हे पुस्तक त्या वेळी थोडे विवादग्रस्तही झाले होते. सामान्यांसाठी जीवनभर झगडणाच्या ताराजींनी उच्चभ्रूची चरित्रे रेखाटावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले होते. त्यांनी लेखिका म्हणून चौफेर लेखन केले. चित्रपट समीक्षा प्राणी, जंगले, कुटुंब नियोजन, आदिवासी कल्याण अशा विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. श्रीमती बेग यांच्या लेखनाप्रमाणे कामातही वैविध्य होते. बालकल्याण, महिला पुनर्वसन, निर्भगी शौचकूपाचा प्रसार इत्यादी कामे वानगी दाखल सांगता येतील. शासनाशी जवळीक असूनही शासनाच्या योजनेतील त्रुटी त्या नेहमीच निर्भिडपणे मांडत. या सर्व कार्य व लेखनात प्रेमाचा सतत ओलावा त्यांनी ठेवला. त्यांच्या कार्याचे वेगळेपण, विविधता, सातत्य यात जसे आहे तसे ते निर्व्याज ओलाव्यातही.

प्रेरक चरित्रे/२०