________________
TD 51 श 'प्रियतमे 'च्या शोधात 6 'प्रियतमा' हे माझे गडकरी-साहित्यविषयक लहानसे पुस्तक ज्यांच्या प्रत्यक्षा- प्रत्यक्ष सहयोगामुळे अशा नेटक्या स्वरूपात प्रकाशित होत आहे, त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेने आज माझे मन भरून आले आहे. या ना त्या निमित्ताने गडकरी साहित्यासंबंधी बोलता- लिहिताना, कलावंत या नात्याने गडकऱ्यांच्या मनात स्त्रीची प्रतिमा नेमकी कशी होती, हा प्रश्न मला छळीत राहिला होता. गडकरी हे बहुमुखी प्रतिभेचे देणे लाभलेले कलावंत : कवी, reer आणि विनोदकार. परस्परांहून भिन्न भासणाऱ्या भूमिकांत लीलया संचार करणारे. अशा असाधारण कलावंताच्या मनाचा अंतर्वेध घेऊन, त्याच्या मानस प्रियतमेचे दर्शन घडवणे हे चिमटीत बारा पकडू पाहण्यासारखे आहे, याची मला स्पष्ट जाणीव आहे. तरीही तो पकडण्याचा हा एक नम्र प्रयत्न मी केला आहे तो स्वानंददायी आहे म्हणून. मला छळीत राहिलेल्या प्रश्नाचे हे अखेरचे उत्तर आहे, असा माझा दावा नाही. परंतु प्रामाणिकपणे उत्तराचा शोध घेताना मला खुणावत राहिलेली विचारांची ही एक दिशा आहे. गडक-यांच्या त्रिविध साहित्यसृष्टीत प्रकटलेली स्त्री-प्रतिमाही दृश्यतः त्रिविधच आहे. नाटककार गडकऱ्यांनी गौरवलेली समर्पणशील पतिव्रता, विनोदकार बाळक- रामाने ओठांवर हसू अन् डोळयांच्या काठांवर आसू खेळवीत पाहिलेली रूढिग्रस्त पीडिता आणि कवी गोविंदाग्रजांच्या समग्र दृष्टीला नि अनुभवसृष्टीला व्यापून राहिलेली स्वामिनी प्रियतमा ही त्या प्रतिमेची त्रिविधता आहे. या त्रिविधतेत संगती कशी शोधायची ? की या कलावंताच्या खंडित आणि म्हणूनच विसंगतीने व्यापलेल्या व्यक्तिमत्त्वाचे द्योतक म्हणून या त्रिविधतेचा अन्वयार्थं लावायचा ? या प्रश्नाचे उत्तर सहृदय रसिकाच्या दृष्टीतून काव्यात्म न्यायाच्या भूमिकेतून शोधताना मळा