________________
स्त्रिया या विवाहित, समर्पणशील भक्त श्रेणीच्या पतिव्रता म्हणूनच वाचक- प्रेक्षकांच्या आदराचा आणि सहानुभूतीचा विषय ठरतात. कवितेतील अनाद्यनंत प्रेयसी याउलट गोविंदाग्रजांच्या प्रेमकवितेतली नायिका ही अनाद्यनंत प्रेयसीच आहैं. कविवर्य तांब्यांच्या कवितेतल्या नायिकेप्रमाणे ती पत्नीपदी आरूढ झाल्याच्या पुसटशा खुणाही कुठे दिसत नाहीत. गोविंदाग्रजांच्या कवितेतली नायिका ही सदायोवना, सौंदर्यसंपन्न, चतुर, मोहविणारी, झुलविणारी, प्रीतीचे विविध विश्वग करणारी ललना आहे. ती आपल्याच मदमस्त धुंदीत असणारी आणि प्रियकराला आपल्याभोवती भिरभिरत ठेवणारी, त्याला शरणागत करणारी रूपगर्विता आहे. उलट नाटकांतल्या नायिकेच्या देहसौंदर्याची वर्णने कुठेच केलेली नाहीत. तिथे भर आहे तो त्यांच्या मनोधारणेवर इथे मात्र ही नायकाची लीलासहचरी, क्रीडासखी म्हणूनच मोहविते. कधी अनुकूल कौल देते, पण बहुधा त्याला झुलवत ठेवून निराशाच पदरी बांधते. इथे 'तो' तिच्यासाठी झुरतो, तडफडतो, समर्पणोत्सुक मर्पित होतो. त्याची भूमिका समर्पित भक्ताची असते. तो हळवा, स्वप्नाळू. आदर्श प्रेमाचा पुतळा असतो. तो तिच्याच ध्यानात हरवलेला असतो.' परस्परभिन्न प्रतिमांतील संगतीची समस्या गडकऱ्यांच्या नाटकांतली स्त्री आणि कवितेतली स्त्री अशी परस्परभिन्न प्रकृतीची आहे. तीच गोष्ट पुरुष चित्रणांचीही. एकाच प्रतिभावंताकडून जेव्हा अशी टोकाची चित्रणे होतात, तेव्हा त्याचा अर्थ कसा लावायचा ? नाटककार गडकऱ्यांची अनुभूती आणि कवी गोविंदाग्रजांची अनुभूती हीच भिन्न आहे का ? की एकाच व्यक्तिमनातले हे खंडितत्व या दोन वाङ्मय-रूपांत व्यक्त होते. कलावंताच्या खंडित व्यक्तिमत्त्वातून ( Split Personality मधून ) हे परस्परविरोधी आविष्कार झाले आहेत, की त्यामागेही काही संगती आहे ? या कलावंताच्या मनात स्त्रीची नेमकी कोणती प्रतिमा आदर्श म्हणून रुजलेली आहे ? गडक-यांच्या स्त्रीविषयक भूमिकेचा विचार करताना, ते सुधारक होते की सनातनी, याचीच चर्चा पुनः पुन्हा झालेली आहे. त्यांच्या मनात परंपरावाद घट्ट मुळे धरून होता, म्हणून त्यांनी पातिव्रत्याचे आदर्श मांडले; पुनर्विवाह, प्रीति- विवाह नाटकांतून सुद्धा दाखवले नाहीत, असा त्यांच्यावर आक्षेप आहेच, गडकऱ्यांचा सुधारणावाद वरवरचा होता; खन्या अर्थाने स्त्रीचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व त्यांना अभिप्रेत नव्हते, असे म्हणत असताना गोविंदाग्रजांच्या कवितेत मात्र चुंबनालिंगनांची प्रतिभावंताची प्रियतमा ५५