________________
आणि पाश्चिमात्य विनोदाचे अनुकरण करणारी आमची लेखक मंडळीही मनोभावे त्याच एका आसाभोवती फिरत आहेत. आधुनिक विनोदी लेखकांमध्ये ही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर आहे. त्या मानाने कोल्हटकर, गडकरी, चि. वि. जोशी यांमध्ये ती कमी प्रमाणावर आहे. उलट रूढींमध्ये भरडून निघणाऱ्या स्त्रीविषयी त्यांच्या मनात सहानुभूतीच आहे. रूढी आणि सामाजिक अपप्रवृत्ती हे त्यांचे हास्यविषय आहेत. परंतु गडक-यांनीही एका लेखात स्त्री हाच हास्यविषय केला आहे : स्वयंपाकघर हे स्त्रियांचे खास क्षेत्र ! तेव्हा तर ते मोठ्या प्रमाणावर त्यांचे क्षेत्र होते. मात्र निम्नमध्यवर्गीय स्तरातील स्त्रीची स्वयंपाकघरातील एकूण (गैर) व्यवस्था, गबाळेपणा, अस्वच्छता, अव्यवस्थितपणा, आळशीपणा इत्यादी अनेक स्वभावदोष 'स्वयंपाकघरातील गोष्टी 'चे वर्णन करताना गडक-यांनी खुमासदारपणे सांगितले आहेत. स्त्रीस्वातंत्र्य आणि समान हक्क या मागण्या सुधारणावादी मंडळींकडून पुढे येऊ लागल्या होत्या. त्या वेळी आम्हां पुरुषांनाच 'स्वयंपाकघरातले समान हक्क ' मिळाले पाहिजेत, अशी स्त्रियांना आनंदाश्चर्याचा धक्का देणारी मागणी करणारा बल्लवाचार्य बाळकराम पुढे सरसावतो. तो पुराणकाळापासून पाकशास्त्रात निपुण असलेल्या पुरुषवर्गाची सोदाहरण आठवण करून देतो. मोठमोठ्या राजे- रजवाड्यांकडे प्राचीन काळापासून मुदपाकखान्यात स्त्रियांपेक्षा पुरुषांचाच साधिकार बावर असल्याचीही उदाहरणे देतो. आणि या सगळ्या आधारावर आधुनिक काळातही स्वयंपाकघरातले समान हक्क पुरुषांना मिळावेत, म्हणून मागणी करतो. स्त्रीवर्गाला हसत खेळत मारलेल्या या कोपरखळ्या आहेत. पाकशास्त्र हे केवळ स्त्रियांचे क्षेत्र नाही, उलट अधिक प्रमाणावर आणि अधिक कौशल्यपूर्ण पाक- सिद्धीची क्षेत्रे ही प्राचीन काळापासूनच पुरुषांच्या हाती असल्याचे सत्य तो सांगतो. गडकरी भाषाप्रभू आहेत. कोटिबाजपणा हा त्यांच्या भाषाविलासाचा सहज- धर्म आहे. भाषा ते अनेक परींनी लीलया वाकवतात, खेळवतात. व्यवहारातल्या भाषेत लपलेल्या अनेक मजेशीर खाचा-खोचा ते सहज लक्षात आणून देतात. — स्वयंपाकघरातल्या गोष्टी' सांगतानाही स्त्रियांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर जरी त्यांच्या विनोदाचा रोख असला, तरी त्यांचा भाषाविलासही त्यात खुमारी आणतो. त्यांनी जी नबीन पदार्थांची यादी दिली आहे, तीच नमुनेदार आहे. 'चापटपोळ्या', 'धम्मकलाडू', ' कणिक तिवणे', विहिणीची • रेवडी'. 'पोळ्या लाटणे', ' बर्फीची चटणी', ' थंडा फराळ', 'अंगाचा तिळपापड', 'मनातले मांडे', 'हाडांची पूड', 'अकलेचा कांदा', 'गुळाचा गणपती', इत्यादी इत्यादी. मराठीत अन्य संदर्भात वापरले जाणारे शब्दप्रयोग स्वयंपाकघराच्या परिवेशात समोर ठेवून गडकऱ्यांनी थोडी गंमत केली आहे.. शिवाय सुशिक्षित स्त्रियांसाठी सुरू झालेल्या मासिकांतून नवीन पदार्थाच्या पाककृती देण्याची जी पद्धत सुरू झाली G ५० प्रियतमा