Jump to content

पान:प्रियतमा.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कमलाकर काय, हेही 'अहं' - तृप्तीसाठीच परपीडनाच्या मागे लागतात. त्यां परपीडनासाठी त्यांनाही आत्मक्लेश भोगावे लागतातच. वृंदावनच्या आणि कमलाकरच्या मनाची ओढाताण होत नाही, असे नाही. पण जगावर सूड उगव- ण्याच्या प्रेरणेने झपाटलेल्यांना या परपीडनातही एक खोल समाधान लाभत असते. म्हणजे सर्व स्त्रिया या इतरांना समाधान लाभावे म्हणून आत्मक्लेशाचा- आत्मपीडनाचा मार्ग स्वीकारतात. परमार्थाने त्यातच आत्मसमाधान - आत्मतृप्ती शोधतात. आणि पुरुष आत्मक्लेशातून परपीडनाचे उद्दिष्ट साध्य करतात. त्यातच एक विकृत समाधान शोधतात आणि संपतात. ईश्वर आणि जयंत यांचे संन्यास स्वीकारण्याचे मार्गही निराशेतून आत्म पीडनाकडे नेणारेच आहेत. उघडपणे त्यात परपीडनाची क्रूरता नाही, पण उदात्त भावातून संन्यास न स्वीकारता लौकिक सुखाच्या सर्व वाटाच बंद झाल्या म्हणून, केवळ नाइलाजाने, निराशेने त्यांनी संन्यासाचा - एक परीने आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारलेला आहे. पौराणिक कथांमध्ये असणारी ढोबळ अद्भुतता या कथांतून नाही. परंतु अमानवी आदर्श दाखविण्यापोटी आलेली कल्पनाचमत्कृती मात्र या कथांतून आणि व्यतिरेखांतून आहे. नितांत आत्मकेंद्रित्व ( self-centeredness) असलेल्या या व्यक्तिरेखा आहेत आणि आत्मकेन्द्रित्वाचेच अतिरेकीपण त्यांना आत्मक्लेशाकडे आणि नंतर विनाशाकडे नेते. एक परीने ते त्यांचे मानवीपण - प्राकृतिक माणूसपण संपवते आणि अनैसर्गिक मनःपिंड घडवते. आधुनिक परिवेशातील पुराणकथा गडक-यांच्या कथानकातील वातावरण समकालीन सामाजिक-कौटुंबिक आहे. त्यांच्या नायिकाही लौकिकार्याने आधुनिक (समकालीन ) काळात वावरणाऱ्या (अपवाद वसुंधरा) आहेत. मालती, सिंधू आणि सुशीला त्या काळानुसार शिक्षितही आहेत. वसुंधरेच्या भोवतीचे वातावरण मध्ययुगीन सरंजामशाहीचे आहे. तरी ती बुद्धिमती आहे, असे समजले जाते. या सर्वजणी जरी शिक्षित असल्या, बुद्धिमती, विचारी असल्या ( असे गृहीत धरले ) तरी त्यांचे संपूर्ण जीवन हे मानीव भावमूल्यांनी आच्छादलेले आहे. त्यांची भावप्रवणता ही पुराणकथेतील व्यक्तिरेखांनाच शोभून दिसणारी आहे. त्यांच्यावर कोसळणारी संकटपरंपरा पुराणकथेत शोभून दिसणारीच आहे. आधुनिक वातावरणाच्या परिवेशाचा आभास निर्माण करून गडकरी पारंपरिक पुराणकथाच पुन्हा मांडतात. लौकिक जीवनात स्वतःवरच नव्हे, तर दुसऱ्यावरही अन्याय करणाऱ्या या टोकाच्या अहंकेंद्री व्यक्तिरेखा आहेत. गडक-यांच्या नाटकांतील पातिव्रत्य ३१