Jump to content

पान:प्रियतमा.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिसले. हे नावीन्य केवळ कल्पना चमत्कृतीचे, भाषाप्रभुत्वाचे किंवा अलंकरणाच्या लखलखाटाचे नव्हते. हे वेगळेपण प्रेमविषयाकडे पाहण्याच्या अगदी मूलभूत अशा दृष्टीतलेच होते. गोविंदाग्रजांच्या कवितेतला 'तो' सातत्याने 'ति 'चा शोध घेतो आहे, 'ति 'च्यासाठी व्याकुळ होतो आहे, ' ति 'च्या एखाद्या कटाक्षाने मोहरून जातो आहे, प्रेमाच्या एका उत्कट क्षणासाठी अनंत मरणे ओढवून घेण्यासाठी आतुर होतो आहे, एका चुंबनासाठी पुन्हा पुन्हा मरणभेटीचा सोहळा आनंदाने भोगण्या- साठी एका पायावर तयार होतो आहे, प्रीतिभावनेचा 'गोफ' उलगडताना त्याच्या आतड्याला पीळ पडतो आहे. दगडासारख्या निष्प्रेम चिरंजीवनाचा तो धिक्कार करतो आहे. एका प्रेमाशिवाय त्याला विश्व शून्य वाटते आहे आणि प्रीतीच्या एका उत्कट क्षणाच्या भोगासाठी अनंत वेळा मृत्यूला मिठी मारण्यासाठी तो आसुसलेला आहे. प्रीतीसाठी आसुसलेला इतका उत्कट नायक मराठी कवितेला, मराठी मनाला, मराठी वातावरणाला अगदी नवा होता. कदाचित् तो मनामनात सुप्तावस्थेत असेल. गोविंदाग्रजांच्या नायकाच्या रूपाने त्याला 'समानधर्मा' भेटला आणि त्याचा त्यालाच जणू नव्याने 'शोध' लागला. असे म्हटलेलेही कदाचित् कुणाला रुचणार नाही. गोविंदाग्रजांच्या विश्व- ब्यापक प्रेमकल्पनेची स्पष्टीकरणे त्यासाठी दिली जातील. यापूर्वीही ती दिली गेली आहेत. प्रेमासाठी आसुसलेल्या या कवीला ' बायरन' चे आकर्षण वाटते आणि ' प्रेमाची प्रामाणिकता' सांगत असताना ' व्यवहाराच्या परी संगती प्रीति होइना सुखावहा ! ' हे त्याला प्रामाणिकपणे वाटतेच. पण त्याला उपाय काय ?. तर ' प्रीतीच्या रसगंगेत जीव विकारी असला, तरी शिष्ट कल्पनांचा त्याग केला की आत्म्याच्या अविकारी अवस्थेप्रत जाता येते. अश्रुजलासह हृदयार्पण करणे हा एकच मार्ग उरतो' आणि त्यासाठी कवी ' प्रेमासह नभ्रू' वाहण्यासही सिद्ध होतो. प्रीतीचे हे उदात्त रूप त्यांच्या अनेक कवितांतून दिसते. जगात जगण्यासाठी गरिबांना प्रीति-देवतेचाच आधार असल्याचा 'प्रेमपाठ' कबी शिकवतो. अखेर परमात्माही प्रेमरूपातच रमलेला आहे. (प्रेम-पाठ ) असे प्रीतिस्तोत्रही कबी ' प्रेमाचा भाट' होऊन गात आहे. ' अल्लड प्रेमास' त्याचे हक्काचे स्थान जे हृदय ते सोडून कुठे जाऊ नये म्हणून तो अडवतो. प्रेमाचे विश्वातले वेगळेपण स्वानु- भवाने सांगताना काही दृष्टांत देतो. फूल कोमेजले की त्याचा वास संपून जातो, पूर ओसरला की नदीचे पात्र कोरडे पडते; मग प्रेमविषयीभूत वस्तू दूर गेल्यावर त्याच्याच स्मृती तेवढया का बरे छळत राहतात ? -अशी 'एक शंकाही 'ही त्याच्या मनात येऊन जाते. १४ प्रणयभावनेचा उपहास करणारांना ' प्रेमाखातर ' आजवर काय काय झाले प्रियतमा