पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आलं की, इन्स्पेक्टर खाननी कावडधारी यात्रेकरूंना प्राधान्यानं दर्शन घेण्यासाठी मंदिरात रांग सोडून प्रवेश दिला जातो, त्याची माहिती नसल्यामुळे पोलिसीपद्धतीने हडेलहप्पी करीत कावडधारकांना अडवलं व रांग सोडून आत प्रवेश दिला नाही, त्यामुळे यात्रेकरू चिडले. त्यातील काहींनी सोबत आणलेले हातातले नारळ पोलीसांवर फेकून मारायला सुरुवात केली. परंतु त्यांच्या काही प्रमुख नेत्यांनी हस्तक्षेप करून त्यांना शांत केलं. या गडबडीमुळे मंदिराच्या पुजाऱ्यांनी मंदिरामध्ये गडबड होऊ नये म्हणून व मंदिर सुरक्षेसाठी मुख्य प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे दोन-तीन किलोमीटर्स पर्यंत लागेली भक्तांची लांबलचक रांग पुढे सरकेनाशी झाली होती. खाली रांगेतील शेवटच्या लोकांना काय झालं हे कळत नव्हतं, त्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला होता. 'मि.खान. तुम्हाला खालचे कर्मचारी सांगत होते तरी परंपरेनुसार कावडधारकांना रांग थांबवून प्रवेश देणं आवश्यक होतं, पण तुम्ही ते रोखलं. हे ठीक नाही केलं.'

 ‘पण सर, आता वातावरण तप्त झालं आहे. लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण झाली आहे; आपण तालुका मॅजिस्ट्रेट आहात. आम्हाला गरज पडला तर लाठीचार्ज व गोळीबारची परवानगी द्यावी.'

 चंद्रकांत एकदम ओरडला, ‘स्टॉप मि.खान! डोंट अटर अ सिंगल वर्ड. आय विल हँडल द सिच्युएशन.'

 त्याच्या मनातं विद्युत वेगानं विचार येत होते. खाननी गोळीबारची परवानगी मागितली. ती नक्कीच काही यात्रेकरूंनी ऐकली असणार. त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया स्वाभाविकपणे भीतीची असणार. एकाकडून दुस-याकडे ही बातमी हां हां म्हणता पसरणार आणि गर्दीचं मानसशास्त्र असं असतं, की लोक अशावेळी सैरभैर होतात व पळापळी-चेंगराचेंगरी सुरू व्हायला वेळ लागत नाही. इथ पण असं होऊ शकतं. ते थांवबलं पाहिजे. त्याक्षणी काहीतरी परिणामारक कृती केली पाहिजे.

 आणि चंद्रकांतनं एक खेळी केली. तो मोठ्याने ओरडला. 'इन्स्पेक्टरसाहेब, हे यात्रेकरू आहेत, लुटारू व दरोडेखोर नाहीत. ते नेहमीच शांततेत व शिस्तीत यात्रा पार पाडतात. मला तुमच्या पोलीस बंदोबस्ताची गरज नाही. तुम्ही इथून निघून जा. मी एकटा इथे पुरे आहे. हे शंभू महादेवाचे भक्त आहेत, त्यांना मी विनंती करीन, ते शांतपणे दर्शन घेतील. तुम्ही इथून ताबडतोब निघून जा.'

 आपला अपमान झाला या भावनेने चिडून खान पाय आपटीत निघून गेला

 चंद्रकांतला अपेक्षित परिणाम दिसून आला. वातावरण हळूहळू शांत होत गेलं, “होय, आम्ही यात्रेकरूच आहोत. गुंड, लुटारू नाहीत. आम्हाला परंपरेनुसार

९८ । प्रशासननामा