पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महसुली कामे हातावेगळी केली, त्याचं आपण किती कौतुक केलेत! सर्व मंडल अधिकाऱ्यांची तुम्ही बैठक बोलावलीत. दिवसभर स्वतः उपस्थित राहिलात. मंडल अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरूप व अंमलबजावणीवर मी दिवसभर बोललो. ते तुम्ही स्टेनोग्राफरला सांगून शब्दशः लिहून घेतले. त्या आधारे मंडल अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शिका' माझ्याकडून लिहून घेतली आणि स्वतःच्या विवेचक प्रस्तावनेसह प्रकाशित करून सर्वांना पाठवली. घरी आपल्या पत्नीला आवर्जून सांगितले, 'तू म्हणत असतेस ना, मी दिवसभर अखंड न थकता बैठकांमधून बोलत असतो. आज माझ्या चंद्रकांतनं माझ्यावर ताण केली आहे. किती छान लेक्चर दिलं!' असं कौतुक माझ्या वाट्यास पुन्हा आलं नाही.

 सर, आपला ध्येयवाद मला मोह घालतो. प्रशासकीय अधिकाऱ्यांत मोजके अपवाद वगळले तर तो इतिहासजमा झाला आहे, असं मला खेदानं म्हणावल वाटतं! ध्येयवाद कृतीत आणण्यासाठी लागणारी व्यावहारिकताही तुमच्याजव होती. नेमकं नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी याबाबत तुम्ही 'या सम हो' होतात. प्रशासनात काम करताना केवळ 'मी प्रयत्न करीन, फळाची आशा धरणार नाही' हा गीताप्रणीत अनासक्त कर्मयोग चालत नाही. कारण विकास कामात लक्ष्यं ठरवावी लागतात आणि प्रयत्नपूर्वक गाठावी पण लागतात: आपण या अर्थाने आसक्त कर्मयोगी होतात. विकास कामाचे लक्ष्यरूपी फळे मिळण्याची आशा धरणारे, पण ही फळं आम नागरिकासाठी होती. म्हण दुसऱ्या अर्थानं अनासक्तही. ही छानशी गुंतागुंत म्हणजे तुमचं वेगळं, लोभस दुर्मीळसं व्यक्तिमत्त्व. सर, हे लिहिताना मी यत्किंचितही अतिशयोक्ती करा नाही. बिलीव्ह मी!

 अण्णा हजारे यांना आपल्याबद्दल माहीत आहे की नाही, याची मला कल्पना नाही. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या लढाईत त्यांच्यासारखाच आपल्या क्षेत्रात शांतपणे, कोणतीही पोझ न घेता लढणारा एक खंदा लढवय्या म्हणजे तुम्ही आहात सर! तुम्ही किती नि:स्वार्थी आहात हे मी अनुभवलं आहे. कलेक्टर दौ-यात रेस्ट हाऊस टाळून कुठे चहा-फराळ आपण करीत होता. जेव्हा बिल द्यायला पुढे सरसावलो तेव्हा तुम्ही मला, 'मी सिनियर आहे. बिल देणार' असे म्हणून ते आपण सहजतेनं दिलंत, हे कुणाला सांगितले तर वाटेल? दौऱ्यामध्ये आपल्या बंदोबस्तात कुणाला एक पैची तोशीश लागू याची दक्षता घेणारा अधिकारी तुमच्या रूपात दिसला. आपल्या कार्यक्षेत्रात कुठे व कसा भ्रष्टाचार होतो हे जाणून ती सारी छिद्रे लिंपण्याची आप प्रशासनशैली अजोड होती.

९४ । प्रशासननामा